Kolhapur : इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची, सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना हाक

आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेतून भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया, अशी हाक कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी दिली आहे.

Kolhapur : इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची, सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना हाक
सतेज पाटील, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 8:13 PM

कोल्हापूर :  इचलकरंजी शहरातील मागील पाच वर्षात नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्तेतून भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडवूया, अशी हाक कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला पुन्हा बलशाली बनवू, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे बोलताना केले. त्याचबरोबर पुढील महिन्यात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे जनता दरबार भरवण्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे ते म्हणाले.

अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पालकमंत्री सतेज पाटील हे शुक्रवारी विविध विकासकामांच्या निमित्ताने इचलकरंजीत आले होते. त्यावेळी त्यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीला सदिच्छा भेट दिली. काँग्रेसभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठलराव डाके होते. यावेळी शहरातील अनेक महिला आणि तरुणांनी पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या सर्वांचा नामदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

भाजपला जागा दाखवून देऊ

जनता सुज्ञ असून पाच वर्षात शहराचा विकास करण्याऐवजी शहर भकास करणार्‍यांना आगामी निवडणुकीत निश्‍चितपणे जागा दाखवून देईल. काँग्रेस पक्षाने सातत्याने सामान्य माणूस आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आहे. शहराचा सर्वांगिण विकास हवा असेल तर नगरपालिकेत सत्ता असणे आवश्यक आहे, असं सतेजा पाटील म्हणाले. आगामी निवडणुकीत निश्‍चितपणे महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी पाटलांचे स्वागत शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाबासो कोतवाल यांनी केले. प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी, काँग्रेस पक्षाची भूमिका आणि सद्यस्थिती, भाजपाकडून सुरु असलेले स्वार्थी राजकारण, नगरपालिकेतील भाजपाची सत्ता आणि शहराची दूरवस्था या संदर्भात सविस्तर मांडणी करताना शहराच्या विकासासाठी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत शहराच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी केली. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Zodiac | ‘माइंड गेम’ खेळण्यात पटाईत असतात या राशीचे लोक, या लोकांपासून दोन हात लांब राहिलेलच बरं

Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक

Omicron : बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले, मुंबईत 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.