लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करा, नाहीतर लोककला पुस्तकात बंदिस्त होतील!

महाराष्ट्राची देवी आई तुळजाभवानी ही अनेकांची कुलदैवत असलेलं अधिष्ठान. बऱ्याच ग्रामीण भागातील लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्टया राज्य आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक समाज गट ही संस्कृती मोठया श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येते.

लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करा, नाहीतर लोककला पुस्तकात बंदिस्त होतील!
महाराष्ट्राच्या लोककला

अकोला : महाराष्ट्राची देवी आई तुळजाभवानी ही अनेकांची कुलदैवत असलेलं अधिष्ठान. बऱ्याच ग्रामीण भागातील लोक संस्कृतीचा अविभाज्य घटक महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्टया राज्य आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक समाज गट ही संस्कृती मोठया श्रद्धेने आजही सांभाळतांना दिसून येते. समाजाच्या विविध गटातून, संस्कृतीतून, अनुभवातून तयार झालेली गीते, नृत्यांचे प्रकार, कविता या सगळ्यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोककला ही लोकनिर्मित आहे. लोकांकडून आलेली अभिव्यक्ती आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतीचा ठेवा आहे. अध्यात्मिक,धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक,व्यवहाराच्या दृष्टीने मानवीय भावना यांचा परस्पर संबंध या लोककलांशी जोडलेला आहे.

अविष्कार कलाप्रकारांना महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व

महाराष्ट्रात मंगल प्रसंगी कुळाचार म्हणून दैवतांच्या उपासनेचा एक विधि म्हणून गोंधळ या गीत प्रकाराने जागरण करण्याची प्रथा आहे. देवीच्या उपासनेत, गोंधळास आणि नवरात्र उत्सवात विशेषत्वाने जागरण गोंधळ, आईचा गोंधळ, या प्रकारास विशेष असे महत्व आहे. उपास्य दैवताच्या एक विधि म्हणून तसेच लोक रंजनाचा एक लोककला प्रकार म्हणून या लोक अविष्कार कलाप्रकारांना मराठी लोक जीवनात तसेच महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे.

गोंधळ प्रकाराचा प्रसार व्हावा

अशातच नवरात्र उत्सव सुरु झाले असतांना या गोंधळ प्रकाराचा प्रचार-प्रसार नवीन पिढीस या गोंधळ गीत प्रकारांच्या माध्यमातून व्हावा म्हणून प्रा. नाना विठ्ठलराव भडके यांच्याकडून केल्या गेलेला हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. व्यवसायाने सीताबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील अकोला येथे संगीत विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

अकोल्यात गोंधळ गीतांचा आगळा वेगळा कार्यक्रम

त्यांचा विषय जरी शास्त्रीय संगीताचा असला तरी वेगवेगळया गीत प्रकारांकडे अभ्यास म्हणून पाहणारे प्रा. भडके यांनी यावर्षी अकोला शहरातल्या अनिकट येथील तुळजाभवानी आसरा माता मंदीर, येथे वैविध्यपूर्ण आणि अत्यंत अभ्यासातून सादर केलेला गोंधळ गीतांचा कार्यक्रम खरोखरीच आगळा – वेगळा ठरला असून महाराष्ट्राची लोप पावत चाललेली ही कला संस्कारीत, शिक्षित लोकांनी उचलून धरली पाहिजे तरच येणाऱ्या पुढच्या नवीन पिढीस ही लोककला कळेल, समजेल अन्यथा ही अशीच पुस्तकात बंदीस्त राहिल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश ही यावेळी गोंधळातून देण्यात आला असून हा गोंधळ पाहायला अकोलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Save the endangered culture of Maharashtra, otherwise folk art will be locked in books!)

हे ही वाचा :

मार्डच्या लढ्याला यश, कोरोनाकाळातील रुग्णसेवेची दखल, प्रत्येक निवासी डॉक्टरला 1 लाख 21 हजार रुपये, आदेश जारी

मुंबईत शनिवारी फक्त महिलांसाठी लस, विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI