School open:राज्यातील शाळा सुरु होणार 13 जूनला, विद्यार्थी शाळेत जाणार 15 जूनला, तर विदर्भातील शाळा 27 जूनला भरणार, शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश

शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

School open:राज्यातील शाळा सुरु होणार 13 जूनला, विद्यार्थी शाळेत जाणार 15 जूनला, तर विदर्भातील शाळा 27 जूनला भरणार, शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश
School start dateImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:44 PM

मुंबई– राज्यातील शाळा15जूनपासून (school open)पुन्हा गजबजणार आहेत. नेहमी शाळा 13 जूनच्या सुमारास सुरु होतात, यंदा मात्र कोरोनाच्या उपाययजोना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. शाळा उघडल्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येणार आहे. शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (school department)यांनी दिले आहेत. राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना हे आदेश देण्यात आले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे (Vidarbh)तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होवून चौथा सोमवार, दि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना मात्र 13 जून पासूनच शाळा

दि. 13 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रादूर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे नियोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येवून दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता, निर्देश पाळण्याचे आदेश

कोरोनाच्या चौथ्या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. अशा स्थितीत शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधांच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य सरकार, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे आणि पालकांचे कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे, असे निर्देशही शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.