AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक… सेजल पवार मोठ्या अडचणीत, महिला आयोग आणि सायबर विभागाची एन्ट्री; मोरेचं काय होणार?

डॉ. सेजल पवार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा मृतदेहांवरील आक्षेपार्ह विनोदांमुळे अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. केवळ माफीनामा पुरेसा नसून, त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई अटळ आहे, असे संकेत मिळत आहेत.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक... सेजल पवार मोठ्या अडचणीत, महिला आयोग आणि सायबर विभागाची एन्ट्री; मोरेचं काय होणार?
सेजल पवार हिच्या अडचणी वाढल्या
| Updated on: Jun 12, 2026 | 1:47 PM
Share

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक करणं आता डॉ. सेजल पवारला चांगलंच भोवणार आहे. सेजल पवारसह स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि इतरांवर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या तिघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर, महिला आयोगानेही या प्रकरणात एन्ट्री घेतल्याने सेजल पवारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. केवळ माफीनामा दिल्याने हे प्रकरण बंद होईल असं सेजल पवारला वाटत होते, मात्र, महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने सेजल पवार विरोधात मोठी कारवाईचे संकेत मिळत आहेत.

मुंबईच्या नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 आणि आयटी ॲक्टच्या विविध कलामांतर्गत सेजर पवार, प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हरियाणाच्या डीजीपीला या प्रकरणी त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि क्लिप्सची चौकशी सुरू झाली आहे. हे व्हिडीओ गुरुग्रामच्या एका स्टँडअप कॉमेडी शोचे आहेत. व्हायरल व्हिडीओत हिमांशू जांगडा एका डेटचा अनुभव सांगत आहे. त्याने सांगितलं की, त्याने एका महिलेसाठी 370 रुपयांची बिर्याणी खरेदी केली होती. त्यानंतर त्या महिलेने घर सोडायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की, 370 रुपये खर्च केले आहेत. वसूल तर करणारच.

कायदेशीर कारवाई होणार

तर डॉ. सेजल पवारने रुग्णालयात आलेल्या डेड बॉडीचे प्रायव्हेट पार्ट पाहून जोक मारायचो, असं या शोमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सायबर सेलने तिलाही चौकशी अंतर्गत घेतलं आहे. अधिकाधिक व्ह्यूज मिळावे आणि ऑनलाईन कमाई व्हावी, यासाठी आपत्तीजनक आणि अश्लाघ्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यामुळेच प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि सेजल पवार यांना समन्स बजावलं असून त्यांचं म्हणणं नोदंवलं जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं महाराष्ट्र सायबर सेलचं म्हणणं आहे.

सात दिवसात रिपोर्ट द्या

तर, या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगही सक्रिय झाला आहे. या व्हायरल व्हिडीओची गंभीर दखल महिला आयोगाने घेतली असून प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा यांना चौकशीला बोलावलं आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हरियाणा पोलिसांच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सात दिवसाच्या आत कारवाई करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Follow Us
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर