अंगावर काटा आणणारी घटना, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात तब्बल सात रुग्णांचा मृत्यू

अंगावर काटा आणणारी घटना, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात तब्बल सात रुग्णांचा मृत्यू
नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात तब्बल सात रुग्णांचा मृत्यू

नालासोपाऱ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे (seven patients die in an hour due to lack of oxygen in Nalasopara hospital).

चेतन पाटील

|

Apr 12, 2021 | 11:27 PM

पालघर : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या अवघ्या काही अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेमुळे संपूर्ण नालासोपारा शहर हादरलं आहे (seven patients die in an hour due to lack of oxygen in Nalasopara hospital).

नालासोपाऱ्यात ऑक्सिजन अभावी 10 रुग्णांचा मृत्यू

नालासोपाऱ्यात आज तब्बल 10 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. यापैकी सात रुग्ण हे विनायक तर तीन रुग्ण हे रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये मृत्यूमुखी पडले. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा साठा संपला होता. परिणामी एक तासात तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा केला आहे. याप्रकरणी आता चौकशी होऊन कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच राज्य सरकारने या अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने महत्त्वपूर्ण पावलं उचलणं जास्त जरुरीचं आहे.

ठाण्यात ऑक्सिजनचा साठा संपल्याने 26 रुग्णांना हलवले

ठाण्यात रविवारी (11 जानेवारी) ऑक्सिजनचा साठा संपल्याने तब्बल 26 रुग्णांना पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमधून ग्लोबल हॉस्पिटलला हलवण्यात आलं होतं. ही घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यात 10 रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याच्या याच कोविड सेंटरमध्ये आज संध्याकाळी काही तास रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये बाथरुम आणि शौचालयासाठी देखील पाणी नसल्याची माहिती समोर आली (seven patients die in an hour due to lack of oxygen in Nalasopara hospital).

संपूर्ण राज्यात रुग्णांची हेळसांड

राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नागरीक कोरोनाबाधित होत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना साधा बेड मिळवण्यासाठी चार ते पाच दिवस वाट बघावी लागत आहे. काही ठिकाणी एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार द्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी जमीनीवर रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. काही भागांमध्ये प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचाच साठा कमी पडत आहे. त्यामुळे अक्षरक्ष: रुग्णांचा जीव जाताना दिसतोय. या घटना ऐकल्यावर अंगावर काट येतो. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढता राहीला तर यापेक्षाही आणखी विदारक परिस्थितीत उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित बातमी : 

VIDEO : ‘ससून’च्या शवागृहाबाहेर नातेवाईकांच्या रांगा, गाड्या मोजा, मृतांची भीषणता लक्षात येईल!

पुणे-पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें