Ramdas Athawale:’शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’; रामदास आठवलेंनी कवितेतून व्यक्त केला विश्वास
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनप्रसंगी आठवले बोलत होते. या संलेनच उद्घघाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सांगली: राज्य सरकार (State Government)चालणार नाही असं विरोधक म्हणत असले तरी, आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षे नाही तर पुढील दहा वर्षे चालणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले (Social Justice Minister Ramdas Athavale) यांनी व्यक्त केला. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राहणार आहे हे सांगताना त्यांनी ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्षे चालणार आहे सत्तेची गाडी असा विश्वास त्यांनी आपल्या कवितेतूनही व्यक्त केला.
Solapur News: सोलापूर विद्यापीठावर विद्यार्थी-प्रहार संघटनेची धडक; परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी; आंदोलकांची कुलगुरुंच्या दालनाकडे धाव
#solapuruniversity #mcqexam #praharsanghtana
शिंदे-फडणवीस सरकार आणखी 10 वर्षे
यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं राज्य सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं राज्य सरकार फक्त अडीच वर्षे नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावाही केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
आटपाडीत साहित्य संमेलन
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनप्रसंगी आठवले बोलत होते. या संलेनच उद्घघाटन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आम्हाला कोणतीही चिंता नाही
जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत, तो पर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. असे सांगत ते म्हणाले की, ‘शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीज वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी’ अशी कविता सुद्धा आठवले यांनी सादर केली.
शंकरराव खरात स्मारकासाठी 40 कोटींचा निधी
साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असं अश्वासनही यावेळी केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद, मुलाखत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
