AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

83 वर्षांचा योद्धा लढतोय, सर्वसामांन्याना ऊर्जा देतोय, आता शरद पवारांचा 83 फूट उंच पुतळा उभारणार

sharad pawar statue in maharashtra: पवार साहेबांच्या वाढदिवशी या पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून हा पुतळा उभा होईल. भविष्यात पवार साहेब यांच्या जीविताला धोका आहे. शासनाने हे शोधून काढले पाहिजे.

83 वर्षांचा योद्धा लढतोय, सर्वसामांन्याना ऊर्जा देतोय, आता शरद पवारांचा 83 फूट उंच पुतळा उभारणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 18, 2024 | 9:54 AM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीत वाढत्या वयाचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यांचे झंझावत प्रचार दौरे सुरु आहे. त्यांच्या कार्याची दखल म्हणून शरद पवार यांचा वयाइतक्या उंचीचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी ही माहिती दिली. 83 वर्षांचा योद्धा आज लढत आहे, त्यामुळे त्यांचा 83 फूट उंच पुतळा उभारणार असल्याचे खुपसे यांनी सांगितले.

शरद पवार यांचे सरकार येणार

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात उपळवाटे गावात शरद पवार यांचा 83 फूट उंच पुतळा उभा करणार जनशक्ती शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी सांगितले. मराठवाड्यातील व विदर्भातील अनेक वारकरी या मार्गावरून जातात त्यांना हा पुतळा बघून ऊर्जा मिळेल. भविष्यात शरद पवार यांचे राज्य येणार आहे. सरकार येणार आहे, असे खुपसे यांनी सांगितले.

यामुळे पुतळा उभारणार

महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या सर्व उमेदवारांना जनशक्ती शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. कारण खरी कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात झाली होती. भाजपच्या काळात कागदावरच कर्जमाफी झाली. शरद पवार यांचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. 83 वर्षांचा योद्धा आज लढत आहे. 83 वर्षांचा योद्धा लढत असताना सर्वसामान्याना ऊर्जा मिळत आहे. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघात उपळवाटे गावात शरद पवार यांचा 83 फूट उंचीचा पुतळा उभारणार आहे, असे अतुल खुपसे यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या जीवाला धोका

पवार साहेबांच्या वाढदिवशी या पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात होईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून हा पुतळा उभा होईल. भविष्यात पवार साहेब यांच्या जीविताला धोका आहे. शासनाने हे शोधून काढले पाहिजे. भाजपकडून 100 टक्के शरद पवार यांच्या जीविताला धोका आहे, असा दावा खुपसे यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?