AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,’ मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर

आंतरराष्ट्रीय दर कमी झाले आहेत. तरी केंद्र सरकारने किमती कमी केल्या नाहीत. पेट्रोल हे उत्पन्नाचे साधन आहे केंद्र सरकारचा दृष्टीकोन आहे," असे शऱद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळसा टंचाईवरुनही भाष्य केलं.

'आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,' मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर
SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 4:22 PM
Share

पुणे : सध्या राज्यातील अनेक शहरात पेट्रोल डिझेल शंभरी पार गेले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वाढलेत. मात्र केंद्र सरकारला काही फिकीर नाही. तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कमी झाले आहेत. तरी केंद्र सरकारने किमती कमी केलेल्या नाहीत, अशी टीका पवार यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पेट्रोल उत्पन्नाचे साधन असा केंद्र सरकारचा दृष्टीकोन

“आजची परिस्थिती खूप बदली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वाढलेत. मात्र केंद्र सरकारला काही फिकीर नाही. आंतरराष्ट्रीय दर कमी झाले आहेत. तरी केंद्र सरकारने किमती कमी केल्या नाहीत. पेट्रोल हे उत्पन्नाचे साधन आहे केंद्र सरकारचा दृष्टीकोन आहे,” असे शऱद पवार म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळसा टंचाईवरुनही भाष्य केलं.

वीजटंचाईला राज्य सरकारला दोषी धरणं बरोबर नाही

“कोळशाच्या किमती कमी करण्याचा आग्रह राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केला आहे. राज्य सरकारकडे 3 हजार कोटी थकबाकी असल्याचं केंद्रीय मंत्री सांगत आहेत. या थकबाकीमुळे कोळसा संकट निर्माण झालाय असं सांगितलं जात आहेत. पण केवळ 10 ते 12 दिवस उशीर झाला तर आरोप असे आरोप केले जात आहे. वीजटंचाईला राज्य सरकारला दोषी धोरण बरोबर नाही,” असं शरद पवार म्हणाले.

केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांवर कारवाई करण्यासाठी

तसेच पुढे बोलताना केंद्राकडे राज्याची जीएसटीची थकबाकी आहे. मात्र त्यावर कोणी बोलायला तयार नाही. आजचे केंद्र सरकार भाजप सोडून इतर सरकारवर आरोप करते. इतर सरकारांचा केंद्र सरकारकडून सहानुभूतीने विचार केला जात नाही. केंद्र सरकारकडून विविध यंत्रणाचा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे. केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांवर कारवाई करण्यासाठी केला जात आहे. यापूर्वी सीबीआयला राज्यात कारवाई करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी मागावी लागायची. मात्र आता बाहेरच्या राज्यात गुन्हा घडलाय आणि त्याचे धागेदोरे महाराष्ट्र राज्यात आहेत, असं सांगत कारवाई केली जात आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रीय संस्थांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या केल्या जाणाऱ्या चौकशीवर बोट ठेवले.

इतर बातम्या :

Mumbai Drugs Case : ‘पुरावे द्या, मग बोला’, यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान

कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडेंनीच सांगितलं; अरविंद सावंत यांचा फडणवीसांना टोला

उल्हासनगरमध्ये थरार ! पैशाच्या वादातून आधी दोघांवर हल्ला, पोलिसांवरही चाकूने वार, आरोपी फरार

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान