AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : शिवसेना कोणाची? खटला चालू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील केसबद्दल सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

Supriya Sule : सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीसंदर्भात त्यांच्याच पक्षातले काही लोक नोटीसा पाठवतात. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'तो आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न आहे'

Supriya Sule : शिवसेना कोणाची? खटला चालू असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या सुप्रीम कोर्टातील केसबद्दल सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar-Supriya Sule
| Updated on: Aug 21, 2026 | 3:46 PM
Share

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाविकास आघाडीबद्दल एक मोठा दावा केला. 2014 मध्ये मविआचा प्रस्ताव होता. पण मी तो नाकारला. पण 2019 मध्ये मीच मविआ बनवण्याचा प्रस्ताव दिला. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ‘एकप्रकारे मविआचा कर्ता करविता मी आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता’ असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. 2014 ला नकार दिला. 2019 ला होकार दिला. त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्यांना विचारावं लागेल”

“महाराष्ट्रातले काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. पण एक चांगलं आहे, दिल्लीतली त्यांची मेन लीडरशीप काँग्रेस पक्षाची त्यांची माझ्याशी रोज गाठभेट होत असते. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, वेणूगोपाल, त्यांच्या मनात असं काही असेल असं मी मानत नाही. ते आम्हाला बैठकीला बोलावत असतात. महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाची काँग्रेस यांच्यात कदाचित सुसंवाद नसावा. म्हणून महाराष्ट्र आणि देशाच्या काँग्रेसच्या मतांमध्ये तुमच्या प्रश्नांमधून काहीतरी गॅप दिसतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांच्या पक्षाचा तो व्यक्तिगत प्रश्न

“आमची त्यांच्याबरोबर सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. आजही मी माझ्या मतावर ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाऊंडर मेंबर शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आमची केस इलेक्शन कमिशनला गेली. आमच्या संविधानानुसार, आमच्या संविधानात आमदार-खासदार काय म्हणतात त्यापेक्षा संघटना कोणासोबत आहे ते महत्वाचं आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील

“आठ सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडल्या. शरद पवार प्रत्येक सुनावणीला हजर होते. आठ सुनावण्या झाल्या. पवारसाहेब हजर होते. सुप्रीम कोर्टात आम्हाला सुनावणीची तारीख मिळत नाहीय. शरद पवार पक्षाची आम्हाला अरेंजमेंट करुन दिली आहे” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. “अजित पवार गटाविरोधात आमची कोर्ट केस चालू आहे. आमची लढाई ज्यांचा पक्ष आहे, त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आहे. त्यांना तो पक्ष मिळाल्यानंतर काय करायचं ते शरद पवार ठरवतील. ही संघटना आहे. कोणाची मालकी नाही. पक्ष चुकीच्या पद्धतीने पवार साहेबांकडून काढून घेतला. पवार साहेबांवर अन्याय झाला. नियम-कायद्यांमध्ये मनमानी चालत नाही. हा देश संविधानाने चालतो. ही नैतिकतेची लढाई आहे. ती लढाई व्यक्ती बरोबर नाही, प्रक्रियेविरुद्ध आहे. आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दम नाही. निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील . पण कोर्टात नाही जिंकू शकतं” असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं