AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचं स्वप्न साकार करणार, शरद पवारांचं आश्वासन

शरद पवार यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्ट अब्दुल रहमान अंतुले यांच्या आठवणींना उजाळा दिला (Sharad Pawar share memory of Maharashtra former CM A R Antule).

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचं स्वप्न साकार करणार, शरद पवारांचं आश्वासन
मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने
| Updated on: Feb 21, 2021 | 6:14 PM
Share

रायगड : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्ट अब्दुल रहमान अंतुले यांनी सुरु केलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅ ऐ आर अतुंले विज्ञान शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज (21 फेब्रुवारी) पार पडलं. याशिवाय म्हसळा येथील पचांयत समितीच्या नव्या वास्तूचे ‘बॅ ऐ आर अंतुले’ असं नामकरण करण्यात आलं. विज्ञान शाखेच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी अंतुले यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर अंतुले यांचे विकासकामांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करणार, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे आणि मुश्ताक अंतुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते (Sharad Pawar share memory of Maharashtra former CM A R Antule).

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“सागरी महामार्ग व्हावं हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुल यांचं एक स्वप्न होतं. त्यामुळे या मार्गाला बॅरिस्टर ए आर अंतुले यांच नाव द्यावे. अंतुले हे अतिशय सामान्य घरातून पुढे आले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमडंळामध्ये अंतुले कॅबिनेक मंत्री होते. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. नतंर ते मुख्यमंत्री आणि मी विरोधीपक्ष नेता म्हणून जबाबदारी सांभाळली. माजी पंतप्रधान नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात आम्ही दोघेही कॅबिनेट मंत्री होतो”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“अंतुलेनी रायगडात दळणवळण संबंधित उपाययोजनांसाठी लक्ष घातले. कोकणमध्ये फलोद्यानचा कार्यक्रम राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतला. त्याचा प्रत्यय हेलिकॉप्टरने जाताना येतो. न्हावा शेवा बाधंले. बंदराबाबत तेव्हा आम्ही मागणी केली होती. आज ते मोठ बदंर झाले”, असं पवार म्हणाले.

‘रायगड आणि ठाण्यात मोठ्या बंदराला मान्यता मिळेल’

“रायगड आणि ठाणेमध्ये मोठ्या बंदराची मागणी होत आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल. राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. दिघी बंदराजवळ लवकरच कागदाची सर्वात मोठी कंपनी येईल. त्यामुळे पाच हजार कोटीची गुतंवणुक होणार आहे. पण अल्पसख्यांक समाजाचा महाराष्टाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेबांना जनतेने संधी दिली. अंतुले यांचं सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करणार”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवारांकडून वसंतराव नाईक महाविद्यालयाला पाच लाखांची मदत

शरद पवार यांनी भाषणात वसंतराव नाईक महाविद्यालयाला पाच लाखांची मदत जाहीर केली. ही रक्कम बँकेत एफडी करण्यात यावी. या रकमेच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून दरवर्षी ए आर अंतुले आणि त्यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती देण्यात यावी, असं शरद पवार यांनी जाहीर केलं (Sharad Pawar share memory of Maharashtra former CM A R Antule).

म्हसळा तालुक्यात आंबेत हे अंतुले यांचं गाव

म्हसळा तालुक्यात आंबेत हे अंतुले यांचं गाव आहे. त्यांचा हा मतदारसंघ होता. आता हा मतदारसंघ तटकरे कुटुबियांचा विधानसभा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे आणि राज्यमंत्री अदिती तटकरे याच मतदारसंघातून विधानसभेला विजयी झालेत.

हेही वाचा : पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, ‘या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!’

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.