AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्ला

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पुन्हा टीका केली. नाशिक येथील भाजप अधिवेशनात शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवारांनी शहा यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार नसल्याचा आरोप केला. त्यांनी शहा यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या भाषेवरही टीका केली. पवार यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याबाबतही भाष्य केले.

अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्ला
| Updated on: Jan 24, 2025 | 9:49 AM
Share

साधारण दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पार पडलं. त्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करत त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवार यांनी इतिहासाची पान पलटताना जुन्या गोष्टी बाहेर काढल्या. त्यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्तीगत स्वरुपाचा हल्ला करच अमित शाहांच्या तडीपारच्या वेळचा सर्व इतिहास बाहेर काढला होता. मात्र आज पुन्हा शरद पवार यांनी अमित शहांवर हल्ला चढवला. कोल्हापूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषेदत पवार यांनी अमित शहांवर टीकास्त्र सोडलं. ‘अमित शाह यांच्यावर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही’ असा टोला शरद पवार यांनी लगावला.

काय म्हणाले शरद पवार ?

अमित शाह हे सातत्याने हल्ली जे काही बोलतात. त्याची नोंद महाराष्ट्रातील विरोधकांनी सतत घेतली आहे. शाह यांच्या बोलण्याचा टोन अति टोकाचा आहे. देशाचे गृहमंत्री हे तारतम्य बाळगून भाष्य करतील अशी अपेक्षा असते. पण त्याची प्रचिती काही येत नाही. खरं म्हणजे हे काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही. त्यामुळे अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठे शिकले हे मला माहीत नाही, असे म्हणत शरद पवारांनी अमित शहांवर निशाणा साधला.

आज अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार आहे, त्याबद्दलही पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘आपल्या पक्षाचा विस्तार वाढवण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांचे पावलं दिसतात’ असं त्यांनी नमूद केलं.

अमित शाहांची टीका काय ?

1978 मध्ये शरद पवार यांनी बंडखोरी करुन विश्वासघात करण्याचे जे राजकारण केलं, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवण्याचं काम केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आमच्यासोबत द्रोह केला. त्यांनी विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. त्या उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्याचे काम तुम्ही केले” असं अमित शाह शिर्डीतील अधिवेशनात म्हणाले होते. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना खऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही विजय केले. घराणेशाही राजकारण करणाऱ्यांना नाकारले” अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी

त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अमित शाहांचा सगळा इतिहास बाहेर काढला होता. शाह यांची टीका माझ्या काही जिव्हारी लागली नाही. जिव्हारी लागली अशी नोंद घेणारी ती व्यक्तीही नाही. त्यांची ती लेव्हल नाही असे पवार म्हणाले होते. हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे, असा टालोही पवार यांनी लगावला होता. तर आज कोल्हापूरमध्येही माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा शहांवर टीकास्त्र सोडलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.