शरद पवारांची माघार हाच युतीचा मोठा विजय : मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय. युतीचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारं वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते, की ‘शरद पवार हवा का रुख भाप लेते है’, यावेळी त्यांना हे समजले असावे म्हणून माघार …

शरद पवारांची माघार हाच युतीचा मोठा विजय : मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलंय. युतीचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारं वातावरण आहे. एकदा सभेत मोदी म्हणाले होते, की ‘शरद पवार हवा का रुख भाप लेते है’, यावेळी त्यांना हे समजले असावे म्हणून माघार घेतली असावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”

VIDEO : मुख्यमंत्री काय म्हणाले पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *