धक्कादायक! कोकणातील खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या शिरीष गवसचे निधन, सोशल मीडिया हादरलं
कोकणातून एक धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. रेड सॉईल स्टोरीज या युट्यूब चॅनेलचे संस्थापक शिरीष गवसचे निधन झालंय. या घटनेने खळबळ उडालीये. शिरीष हे कोरोनाच्या काळात आपल्या मुळगावी गेले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती मिळतंय.

- कोकणातून एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. ‘रेड सॉईल स्टोरीज’ (Red Soil Stories) या युट्यूब चॅनेलचे संस्थापक शिरीष गवसचे वयाच्या 33 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
- कोरोनाच्या काळात संपूर्ण जग ठप्प झालं आणि शिरीष गवस हा पत्नीसोबत आपल्या मूळगावी पोहचला. त्यानंतर दोघांनी मिळून युट्यूब चॅनलला सुरूवात केली.
- सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली या त्यांच्या मूळगावी राहून दोघे पती पत्नी गावाकडील गोष्टींवर आणि विषयांवर व्हिडीओ तयार करत. विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.
- शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होता. गोव्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
- गिरीष गवस हे एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होते तर त्यांची पती चित्रपट व्यवसायाशी संबंधित होती. कोरोनानंतर दोघेही गावाकडेच राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुलीचा पहिला वाढदिवस देखील साजरा केला. हे दोघे कोकणातील खाद्यसंस्कृती दाखवत.





