AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana | लिलावती हॉस्पिटलविरोधात शिवसेना पोलीस ठाण्यात, नेमक्या तक्रारी काय?

शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली.

Navneet Rana | लिलावती हॉस्पिटलविरोधात शिवसेना पोलीस ठाण्यात, नेमक्या तक्रारी काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 10, 2022 | 12:23 PM
Share

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचं लिलावती रुग्णालयतलं MRI म्हणजे निव्वळ ड्रामा होता असा आरोप करत थेट रुग्णालयात धडकलेली शिवसेना (Shiv Sena) आज पोलीस ठाण्यातही पोहोचली. शिवसेनेच्या पथकानं आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. नवनीत राणा यांना रुग्णालयात विशेष वागणूक देताना एमआरआय कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा घेवून जाण्यास आणि फोटो काढू देण्यास परवानगी देणाऱ्या लीलावती रुग्णालयाविरोधात ही तक्रार देण्यात आली. बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया पार पडली. शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत शिवसेनेनं काय मुद्दे मांडले, हे पुढीलप्रमाणे-

  1.  तक्रारीत शिवसेनेने नमूद केले आहे की, रुग्णालयाच्या छापील नियमावलीनुसार रुग्णालयात फोटोग्राफी करण्यास परवानगी नाही. असे असताना नवनीत राणा यांची एम आर आय चाचणी सुरू असताना त्याचे फोटो समाज माध्यमात आल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
  2. राणा यांचे हे फोटो कोणी काढले त्याची चौकशी होवून दोषीवर कारवाई व्हावी, एमआरआय कक्षाच्यामागे ऑक्सिजन प्लांट आहे. काही दुर्घटना घडली असती तर रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली असती. त्याला जबाबदार कोण राहिले असते? असा प्रश्न सेनेने उपस्थित केला आहे.</li>
  3. खासदार राणा यांच्यासोबत असणारे बंदूकधारी अंगरक्षक रुग्णालय आवारात शस्त्रासह फिरताना दिसत होते. याकडे लक्ष वेधून सेनेने तक्रारीत नमूद केले आहे की, रुग्णालयाच्या नियमावलीनुसार हत्यार घेवून रुग्णालय आवारात प्रवेश दिला जात नाही. मग हेच अंगरक्षक बंदूक घेवून एम आर आय कक्षात वावरत होते का? याची सीसीटिव्ही फुटेज बघून चौकशी करण्यात यावी.
  4.  या सर्व गंभीर घटना घडत असताना रुग्णालय प्रशासनाने यावर कारवाई करण्याची कोणती भूमिका घेतली याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन