AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी | शिवसेना नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? नागरिकत्वही स्वीकारलं; जवळच्याच व्यक्तीकडून पोलखोल

दीपाली सय्यद, त्यांचे पाकिस्तान, दाऊद इब्राहिम संबंध याविषयी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करूनही काही उपयोग झाला नाही, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केलाय.

सर्वात मोठी बातमी | शिवसेना नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध? नागरिकत्वही स्वीकारलं; जवळच्याच व्यक्तीकडून पोलखोल
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 03, 2023 | 2:20 PM
Share

अहमदनगर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगर येथे आज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.

भाऊसाहेब शिंदे यांचे नेमके आरोप काय?

  • सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दिपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
  •  दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.
  •  यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
  •  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.
  •  दिपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आलाय.
  •  भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटलंय.

‘कारवाई करा, अन्यथा तोडफोड करू’

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही, असा मोठा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. आज पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांच्या पाकिस्तान कनेक्शनचे थेट पुरावेच आम्ही दिले आहेत. त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आगामी काळात   गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही आणि राज्यातील भाजप कार्यालये तोडफोड करून जाळून टाकू, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

Follow Us
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...