AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांना ओवा द्या ओवा, पोटात दुखतंय’ ; शहाजी बापूंचा विरोधकांवर पलटवार

शहाजी बापू यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते सांगल्यात बोलत होते.

'त्यांना ओवा द्या ओवा, पोटात दुखतंय' ; शहाजी बापूंचा विरोधकांवर पलटवार
| Updated on: Oct 25, 2024 | 9:30 PM
Share

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते सांगोल्यात बोलत होते. शहाजी बापू यांच्यावर बंगल्यावरून टीका करणाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या पोटात दुखत असेल तर  त्यांना ओवा खायला द्या असा टोला शहाजी बापू यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू? 

बंगल्यावरून टीका करणाऱ्यांवर आमदार शहाजी बापू यांनी निशाणा साधला आहे. माझं जुनं घर ज्या घरामध्ये पत्रे गळत होते, झोपता येत नव्हतं माझी बायको कसा स्वयंपाक करत होती याचा कोणी विचार केला नाही. मात्र मी एक बंगला बांधला तर त्याच्यावरती टीका करत आहेत. तालुक्यातील पहिला बंगला कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख यांनी आमदार असताना बांधला होता, त्यांनी त्यांच्या मुलासाठी पंढरपूर मध्ये बंगला बांधला आहे. पेनुरमध्ये बंगला बांधला, त्याचबरोबर अमिताभ बच्चनच्या शेजारी देखील मुंबईमध्ये त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे. त्यामुळे मी बंगाला बांधला म्हणून ज्यांच्या पोटात दुखतं  त्यांना ओवा खायला द्या असा सल्ला शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, दीपक आबांमुळं मी निवडून आलो असे सगळीकडे सांगत सुटलेत, मात्र त्यांची मला मदत झाली हे खरे पण मी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये निवडून येतोय आणि 95 साली दीपक आबा आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीमध्ये बसत होते, त्यांची गाडी देखील मी पलटी केली आणि मुंबईला पोहोचलो.  मी दीपक आबांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो, त्यांना काहीतरी कराव लागतंय असं म्हणून रात्री दोन वाजेपर्यंत थांबलो होतो. फोन करतोय दीपक आबांना मात्र ते दौरा आहेत म्हणून सांगताहेत, विधानसभेचे आमदार असताना कुठे गेले होते दौरे असं म्हणत त्यांनी दीपक साळुंखे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा