AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक, थेट नाशिक पोलिस आयुक्तांच्या भेटीला..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. हेच नाही तर थेट रूपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावी, अशी थेटपणे मागणी करण्यात आली. नुकताच सुषमा अंधारे आणि रूपाची ठोंबरे यांनी नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली.

भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे आक्रमक, थेट नाशिक पोलिस आयुक्तांच्या भेटीला..
Sushma Andhare
| Updated on: Mar 27, 2026 | 1:26 PM
Share

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. यादरम्यानच आता नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे आणि संगिता तिवारी यांनी घेतली आहे. या भेटीनंतर बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, या प्रकरणात त्यांनी एफआयआर नोंदवून घेतली आहे. पण त्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे एसआयटीकडे वर्ग केली आहेत. आयओ देखील तिकडे गेले आहेत. या प्रकरणातील तपासाची जी काही गती आहे आणि आमचे जे प्रश्न आहेत, त्याचे उत्तरे ती सर्व एसआयटीसोबत चर्चा केल्यानंतर मिळू शकतात, त्यामुळे कदाचित मी तुम्हाला इतके काही ठोस सांगू शकत नाही, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सध्या आमचे त्यांच्यासोबत अत्यंत प्राथमिक बोलले झालेले आहे. तपास सगळा एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना त्यावर काहीही भाष्य करता येणार नाहीये. ते अगोदर एसआयटीसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर ते उत्तरे देऊ शकतात.

यादरम्यान रूपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांना अटक करण्यात यावे, अशीही मागणी केली. सुषमा अंधारे  आणि रूपाली चाकणकर या प्रकरणात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर थेटपणे रूपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे या प्रकरणात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्ही लवकरच एसआयटी पथकाची भेट घेणार आहोत. चाकणकर यांना अटक करण्यासाठी पोलिस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. भोंदू अशोक खरात प्रकरणात सातत्याने रूपाली चाकणकर यांचे नाव घेत आहे.

रूपाली चाकणकर भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना देखील दिसल्या होत्या, त्यांच्या या व्हायरल व्हिडीओनंतर राज्यात खळबळ उडाली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आपला राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?