AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहींच्या रक्तात आणि नसानसात गद्दारी भरलेली… उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका, थेट..

उद्धव ठाकरे आज शिर्डीमध्ये आहेत. यादरम्यान त्यांनी बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचाैरे यांच्यावर जोरदार टीका केली. हेच नाही तर यादरम्यान ते गद्दारीबद्दल बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीका केली.

काहींच्या रक्तात आणि नसानसात गद्दारी भरलेली... उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका, थेट..
Uddhav Thackeray and Bhausaheb Wakchaure
| Updated on: Jun 29, 2026 | 1:23 PM
Share

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज शिर्डी दाैऱ्यावर आहेत. त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचाैरे यांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे पोहोचले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचाैरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना झाली. कुणाच्या तरी गाडीची चावी हरवली, सापडली तर आणून द्या. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे. की आपला खासदार पळाला आहे. सापडला तर सोडू नका. अजिबात त्याला परत आणू नका. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर असं जग झालं. काहींच्या रक्तात आणि नसानसात गद्दारी भरलेली असते. त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे. जाऊ तिथे खाऊ. पण मी आता तुमच्यासमोर येण्या आधी मला काहीजण भेटत आहेत.

मला म्हणाले, साहेब हा शुभ शकून आहे. ते म्हणाले, या गद्दाराला 2009 मध्ये निवडून दिलं. 2014 ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे. त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे. पवित्र शिर्डी आहे. श्रद्धा आणि सबुरीला महत्त्व आहे. कुठे तरी श्रद्धा असावी लागते. आपली साईबाबावर, कामावर आणि भगव्यावर आहे. यांची कशावर श्रद्धा नाही. सबुरीचा तर पत्ताच नाही. रोज नवीन बाप. जरा थांबला असता तर केंद्रात सरकार आलं होतं.

पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आता थांबला असता तर उद्या येणारं सरकार आपलं आहे. काही काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. उद्या सरकार आल्यावर हे भ्रष्ट विचाराचे लोकं नसावेत म्हणून त्यांना ही दुर्बधी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल, उद्धव ठाकरे यावेळी महिला आरक्षणाबद्दलही बोलताना दिसले. 100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा जगावा.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात