AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमोल कोल्हेंचे बोल जिव्हारी लागले, ठाकरेंच्या शिलेदाराने थेट सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पक्षाच्या वाय. बी. चव्हाण सेंटर येथील बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरण्यासाठी भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत जे वक्तव्य केलं ते वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खूप जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या शिलेदाराने अतिशय ठसकेबाजपणे अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल कोल्हेंचे बोल जिव्हारी लागले, ठाकरेंच्या शिलेदाराने थेट सुनावलं
अमोल कोल्हे आणि उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 10, 2025 | 10:37 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिलेदार खासदार अरविंद सावंत यांनी निशाणा साधला आहे. “अमोल कोल्हे तेव्हा राजकारणातही नव्हते तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला. आम्हाला झोपेतून जागा होत नाही हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. शिवसेना ही जागीच आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी ती कायम जागीच राहील. आम्ही काय करायचंय ते अमोल कोल्हेंनी आम्हाला सांगू नये”, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी सुनावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या बैठकीत अमोल कोल्हे यांनी भाषण करताना ठाकरे गटाबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन मविआत वाद निर्माण झालाय. “राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही”, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केल्याची चर्चा आहे. त्यावरच अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल’

“काँग्रेसने आम्हाला विदर्भामध्ये एकही जागा दिली नाही. आम्ही जागा मागत राहिलो तरीदेखील त्यांनी आम्हाला जागा दिली नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये प्रत्येक पक्ष जर महाविकास आघाडीमधूनच लढत राहिला तर मग ग्राउंड लेव्हलवरती कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होईल आणि ते तयार होणार नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल असं चित्र सध्या तरी दिसतंय”, असं मोठं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं.

‘आदित्य ठाकरे रंग बदलणारे नाहीत’

“रंग बदलणारे आदित्य ठाकरे नाहीत तर रंग बदलण्याचा जे आरोप करतात तेच आहेत. त्यांनी रंग बदललाय. आमचा रंग हा भगवाच होता आणि भगवाच आहे. त्यांचा कुठला रंग आहे हे त्यांनी सांगावा”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं. “टीका कोण करत नाही? टीका प्रत्येक जण एकमेकांवर करत असतो. पण जनतेच्या विकास कामांसाठी भेटणं हे काय गैर नाही. पोलीस हाऊसिंगचा विषय फार मोठा आहे आणि जर त्यांना न्याय मिळत नसेल तर मग करायचं काय?”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

‘त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर आरोप करतात’

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वाल्मिक कराड याची पाठराखण करतात का? असा आमचा सवाल आहे. राज्यात गुन्हेगारी फोफावली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर आरोप करतात हे फार गंभीर आहे. हे महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडलं नव्हतं आणि याकडे जनतेने आता लक्ष देणे गरजेचे आहे”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...