Shivai : एसटीचा इतिहास पुन्हा जिवंत झाला, पुणे ते नगर मार्गावर इलेक्ट्रिक शिवाई धावली, अन्…

शिवाई बसच्या पुणे-अहमदनगर-पुणे या मार्गावर दिवसाला सहा फेऱ्या होणार आहेत. असे मंत्री अनिल परब म्हणाले. आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर आणि आरामदायी प्रवास यामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Shivai : एसटीचा इतिहास पुन्हा जिवंत झाला, पुणे ते नगर मार्गावर इलेक्ट्रिक शिवाई धावली, अन्...
पुण्याहून अहमदनगरकडे धावली पहिली शिवाई बस
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 3:13 PM

पुणे : पुणे ते अहमदनगर अशी इलेक्ट्रिक बस शिवाई आजपासून सुरू झाली असून ती अहमदनगरकडे रवानाही झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सेवेत सकाळी उद्घाटन केले. 1 जून 2022 रोजी एसटी आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. याचेच औचित्य साधत अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसचे (Shivai Electric Bus) उद्घाटन करण्यात आले. एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी शिवाईला हिरवा झेंडा दाखवला. केवटे यांच्या हस्ते पहिल्या ई-बसचे उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील विभागीय कार्यालयातील ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून शिवाई अहमदनगरकडे रवाना झाली. याच वटवृक्षाखालून पहिली एसटी रवाना झाली होती. प्रवाशांचा या बसला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहावे लागणार आहे.

दिवसाला होणार सहा फेऱ्या

1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर या मार्गावर धावली. आज याच दिवशी याच मार्गावर बस धावत आहे मात्र ही पूर्णत: वातानुकूलित आणि प्रदुषणविरहित अशी बस आहे. शिवाई बसच्या पुणे-अहमदनगर-पुणे या मार्गावर दिवसाला सहा फेऱ्या होणार आहेत. असे मंत्री अनिल परब म्हणाले. आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर आणि आरामदायी प्रवास यामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री परब यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

कशी आहे शिवाई?

शिवाई ही मुख्यत: इलेक्ट्रिक बस असून या बसची लांबी 12 मीटर आहे. टू बाय टू अशी या बसची आसन व्यवस्था आहे. तर एकूण 43 आसने उपलब्ध आहेत. या बसमुळे ध्वनी प्रदुषण होणार नाही त्याासोबतच हवेचे प्रदुषणही टाळले जाणार आहे. ही बस वातानुकूलित आहे. बसचा ताशी वेग 80 किमी आहे. तर बॅटरीची क्षमता 322 के. व्ही. इतकी आहे. तीन तासांत 125 किलोमीटरचे अंतर ही बस पूर्ण करणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करण्याची या बसची क्षमता आहे. पुणे आणि अहमदनगर अशा दोन्ही ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.