AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; महाराष्ट्रात आजही ठिकठिकाणी आंदोलनं

कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; महाराष्ट्रात आजही ठिकठिकाणी आंदोलनं
शिवसैनिकांचं आंदोलन
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 11:32 PM
Share

मुंबई : कर्नाटकातील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे. या प्रकारामुळे राज्यात शिवसेना आणि शिवप्रेमी चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत आज भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पांडुरंग सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला. (Shivaji Maharaj statue vandalised in karnataka, There are protests Maharashtra even today)

दक्षिण मुंबईत आज संध्याकाळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक गोळा झाले. त्यावेळी त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाबाबत बोम्मई यांच्या निषेधाचे बॅनर झकावले. तसंच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ‘बोम्मई म्हणतात की अशा छोट्यामोठ्या गोष्टी होत असतात. म्हणजे शिवाजी महाराज हे छोटी-मोठी गोष्ट आहेत का? मग भाजपचं शिवरायांवरील प्रेम बेगडी आहे का? या गोष्टीचा फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्तानात निषेध व्यक्त केला पाहिजे. कर्नाटक सरकार जर माफी मागणार नसेल तर त्यांच्या बसेस महाराष्ट्रात येतात. त्याचा त्यांनी विचार करावा, असा सूचक इशारा पांडुरंग सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. दरम्यान, भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शिवसैनिकांनी आपल्याला शिविगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात आजही ठिकठिकाणी आंदोलनं झाली. राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर मुंबईसह अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीनं विटंबनाचा निषेध म्हणून आंदोलनंही केली. कर्नाटकात भाजप सरकार पण देशाच्या देवांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, चंपा असो वा डंफा असो त्यांनी तोंड ऊघडावीत, असा टोला शिवसैनिकांनी लगावला.

मनसेनं सुद्धा विटंबनेचा निषेध नोंदवला. फक्त राजकारणासाठी महापुरुषांचा अपमान सहन केलेला खपवून घेणार नसल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या दोन पक्षाच्या वादातून महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. भाजप आणि कांग्रेसच्या अंतर्गत वादातून महाराजांचा अपमान झाला असल्याची टीका मनसेनं केली आहे. मतांसाठी पोळी भाजण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेकांना पुतळ्याच्या विटंबनेच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी दिली आहे. त्यामुळे विरोधकांनी यावरुन राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले बोम्मई?

रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतर बातम्या

VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले

Sarangkheda| आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी…मधुलिका कुलीन रुबीची उंची 63 इंच, किंमत 33 लाख…!

(Shivaji Maharaj statue vandalised in karnataka, There are protests Maharashtra even today)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.