नवनाथ बन यांच्याकडून माझं चारित्र्यहनन, व्हिडीओतील तरुणीचा गंभीर आरोप, समोर येत म्हणाली शिवराज मोरे माझ्या भावासारखे!
नवनाथ बन यांच्या खळबळजनक आरोपांनंतर आता ती तरुणी समोर आली असून तिने घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. तर शिवराज मोरेंनीही यावेळी झालेला प्रकार सांगितला आहे.

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी यांना बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. अतिशय खडतर प्रवासातून मी जात होते. मला तो मुलगा खूप हारेषमेंट करीत होता. जे राजकारण चाललं आहे ते अतिशय वाईट सुरु आहे. मी केबिनमध्ये गेले. तेव्हा तो मुलगा माझ्या मागे आला. माझ्यावर धावून आला. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर मी पोलिसांना कॉल केला. त्यानंतर मी यांना कॉल केला. हे माझ्या भावासारखे आहेत. मला यांची मदत नक्की होईल माहीत होतं, म्हणून मी शिवराज मोरे यांना कॉल केला. ते मदतीला धावून आले. मी खरंच धन्यवाद मानते की, मला तुम्ही खरंच मदत केली आणि मला खूप वाईट वाटतंय की हे जे काही राजकारण सुरु आहे त्याचं, अशी प्रतिक्रिया संबंधित तरुणीने दिली आहे. माझी तयारी आहे, मी आणि नवनाथ बन दोघांची नार्कोटेस्ट करा. कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय हे स्पष्ट होऊन जाईल, अशी भूमिका यावेळी शिवराज मोरेंनी स्पष्ट केली आहे.
तरुणी नेमकं काय म्हणाली?
मी तो वीडियो बघितला आहे. नवनाथ बन यांना माहिती नाही, मी ज्या परिस्थिती मधून गेली आहे. नवनाथ दादा बोलले आहेत, या प्रकारामुळे चुकीचे आरोप आहेत. एका मुलीचा चारित्र्य हनन झाल आहे. त्या वेळेस मी किती घाबरले होते. तो मुलगा मला त्रास देत होता मी काही दिवस त्याच्या काँटॅक्ट मध्ये होते. शिवराज दादा यांनी मला मदत केली होती. तो मुलगा माझ्या अंगावर धावून येत होता. ते माझ्या भावासारखे आहेत म्हणून मला हेल्प हवी होती. हे सगळा जे राजकारण सुरू आहे, ते बरोबर नाही. मुलगा मला त्रास देत होता तो मला ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी शिवराज मोरे यांना मदत मागितली होती, असं म्हणत पीडित मुली नवनाथ बन यांचे आरोप फेटाळले आहेत
नेमकं काय घडलेलं?
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी उत्तर दिलं. त्यांनी यावेळी BJP च्या नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपाला आंदोलनस्थळावरून उत्तर देत सांगितलं की, आम्ही गांधीवादी विचारांचे लोक आहोत. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे. राजकारण करताना सगळे चुकतात पण अशा खालच्या पातळीला जाऊन आरोप करणं हे मान्य नाही.
