आमदारांना खोके, ‘यांना’ पेट्या तर द्या… चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?

आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

आमदारांना खोके, 'यांना' पेट्या तर द्या... चंद्रकांत खैरेंचं म्हणणं काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 1:28 PM

औरंगाबादः दिवाळी (Diwali) तोंडावर असतानाच महाराष्ट्रात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. मात्र राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर सडकून टीका केली आहे. दिवाळीत अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतीचं नुकसान झालंय. सोयाबीन गेलं.. काहीच नाही राहिलं… हे सरकार काय करतं माहिती नाही. आमचे इथले एक शेती मंत्री आहेत. ते म्हणाले, आणेवारी नाही काढायची, ओला दुष्काळ जाहीर करायचा नाही… जसं की यांच्या खिशातून पैसे चाललेत का, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.

या लोकांना आमदारांना खोके देता, शेतकऱ्यांना पेट्या तर द्या. हे नाहीच होते… आजपासून दिवाळी सुरु झाली आहे आणि शेतकऱ्यांना काहीच नाही? ही चुकीची गोष्ट असल्याचं खैरे म्हणाले.

पाहा चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी काल मनसेच्या एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे राज ठाकरे शिंदे-फडणवीसांसोबत आगामी निवडणुकांत लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रकांत खैरे यांनी या विषयावर सडेतोड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एवढे मजबूत आहेत की, त्यांना याची काहीही पर्वा नाही. बाळासाहेब ठाकरे आणि जनतेचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांना आहे. या तिघांचं रोज काहीतरी चालंलंय. पण तेही ठाकरेच आहेत. हे दोघं त्यांना कितपत मदत करतील…. या दोघांना लहर आली की ते काहीपण करतील, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भीतीमुळे, दहशतीमुळेच हे तिघे महायुतीत एकत्र आले आहेत, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलंय.

एकूणत शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.