AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा! बडा नेता नाराज? महत्त्वाच्या बैठकीला दांडी, शिवसेनेत खळबळ

Shivsena : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यात बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र नाशिकमधील बैठकीला शिनसेनेचा एक बडा नेता अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा! बडा नेता नाराज? महत्त्वाच्या बैठकीला दांडी, शिवसेनेत खळबळ
Eknath Shinde NashikImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 18, 2026 | 2:42 PM
Share

शिवसेनेने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली आहे. आजपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये आज राज्यातील पहिली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यात या बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे देखील नाशिकमधील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी ही बैठक होत आहे. मात्र आता या बैठकीवेळी शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक

शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेतला जात आहे. पक्ष संघटन कसे मजबूत केले जाईल याबाबत बैठकीत मंथन गोत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात देखील बैठकीत आढावा घेतला जात आहे. मात्र या बैठकीला नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे.

बडा नेता गैरहजर

शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीला हेमंत गोडसे अनुपस्थित आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे शिनसेनेत नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते गैरहजर असल्याने राज्यातील पहिल्याच बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नव्या कार्यकारणीत संधी न दिल्याने गोडसे नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. हेमंत गोडसे नाशिकमध्ये असूनही बैठकीला न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. कारण या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि अनेक आमदार-खासदार, नगराध्यक्ष, उपमहापौर, नगरसेवक उपस्थित आहेत, मात्र गोडसे गैरहजर असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

श्रीकांत शिंदेंनंतर आदित्य ठाकरेही नाशिक दौऱ्यावर

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेही नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे 24 मे रोजी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. पक्ष संघटन वाढविण्यासह, पक्षाची पडझड, डॅमेज कंट्रोल थांबवण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...