‘राज ठाकरेंना पत्र लिहण्याचा अधिकार, पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम’

लोकांच्या विरोधामुळेच शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. | Uday Samant

'राज ठाकरेंना पत्र लिहण्याचा अधिकार, पण शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम'
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 2:51 PM

रत्नागिरी: नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. लोकशाहीत राज ठाकरे यांना तसा अधिकार आहे. मात्र, शिवसेना नाणार प्रकल्पाविषयीच्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेवरच ठाम आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केले. (Shivsena leader Uday Samant on Nanar nanar refinery project)

ते रविवारी रत्नागिरीत ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. दुसऱ्या पक्षांनी पत्र लिहलं तरी शिवसेनेची भूमिका निश्चित आहे. लोकांच्या विरोधामुळेच शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने आता त्यांची भूमिका मांडली आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. कोकणासाठी समग्र धोरण ठरवा

राज्य सरकारने आता सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांच मत बदलवावं. हे करताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. त्याचबरोबर तातडीने कोकणाच्या पर्यटनासाठी एक समग्र धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासाचं एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर ठेवणं शक्य आहे. नियती अशी संधी क्वचितच देते ती गमावू नये ही कळकळीची विनंती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मनसे सहकार्य करणार, आराखडाही देणार

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोकणला विकासाचं मॉडेल करा

कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो तेंव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात या दृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही जो आता व्हायला हवा असं मला वाटतं, असं राज यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा युटर्न का?; वाचा सविस्तर

(Shivsena leader Uday Samant on Nanar nanar refinery project)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.