AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking | शिंदे-भाजपात जागा वाटपावरून ठिणगी? गजानन कीर्तिकरांनी ठणकावलं, लोकसभेला आणि विधानसभेला ‘तोच’ फॉर्म्युला हवा!

आगामी निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र जागावाटपासून दोन्ही पक्षात आतापासूनच ठिणग्या उडण्यास सुरुवात झाली आहे.

Breaking | शिंदे-भाजपात जागा वाटपावरून ठिणगी? गजानन कीर्तिकरांनी ठणकावलं, लोकसभेला आणि विधानसभेला 'तोच' फॉर्म्युला हवा!
गजानन कीर्तिकर, शिवसेना आमदार Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 25, 2023 | 4:47 PM
Share

गोविंद ठाकूर, मुंबई : आगामी विधानसभा (Assembly) आणि लोकसभा (Loksabha) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिंदे-भाजप युती तसेच महाविकास आघाडी परस्परांविरोधात रणनीती आखत आहेत. मात्र युती आणि आघाडी अंतर्गतच जागावाटपाचं गणित अत्यंत गुंतागुंतीचं असल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालंय खरं. पण शिंदेगट आणि भाजपामध्ये जागावाटपावरून प्रचंड घमासान होणार असल्याची चिन्ह दिसतायत. विशेषतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याचं दिसून येतंय. बावनकुळे यांनी विधानसभेला शिंदे गटाला 50 जागा देण्यात येतील असं वक्तव्य केल्यानंतर आता गजानन कीर्तिकर यांनीही भाजपला चांगलंच सुनालंय. 2019 च्या फॉर्म्युल्यानुसारच जागावाटप हवं, असा इशारा त्यांनी दिलाय.

50 नाही, विधानसभेला 126 जागा

जागावाटपावरून प्रतिक्रिया देताना गजानन कीर्तिकर म्हणाले, शिवसेनेसाठी 50 नाही तर विधानसभेला 126 जागा सोडाव्या लागतील. लोकसभेला 22आणि विधानसभेला 126 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होऊ शकते, पण सूत्र बदलता कामा नये, असा इशारा कीर्तिकर यांनी दिलाय.

‘शिंदेंची शिवसेना कमजोर नाही’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय कमजोर नाही, असं शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपला ठणकावून सांगितले. शिवसेना-भाजप यांनी २०१९ मध्ये युती करुन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या.

‘तोच फॉर्म्युला हवा….’

लोकसभेला भाजपने 26, तर शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. विधानसभेला आम्ही 126, तर भाजपने 162 जागांवर उमेदवार दिले होते. हा फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे.

लोकसभेला 22 आणि विधानसभेला 126 जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत. एकनाथ शिंदेंची शिवसेना कमजोर नाही, असं गजानन कीर्तिकर म्हणाले..

भाजप तेव्हा सत्तेबाहेर होता…

तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप सत्तेबाहेर होता, हे गजानन कीर्तिकर यांनी आवर्जून दाखवून दिले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने भाजप सत्तेत आल्याचं कीर्तिकर म्हणाले. जागावाटपात शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी भाजप ऐकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ मला आशा आहे की भाजपही आमचे ऐकेल, कारण भाजप महाविकास आघाडीच्या वेळीही सत्तेबाहेर होता आणि एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि चांगले काम करत आहेत.

घडले त्यास राहुल गांधी जबाबदार!

राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने बजावलेली शिक्षा आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई झाली. यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. गजानन कीर्तिकर यांनी यासाठी राहुल गांधींनाच जबाबदार धरलंय. ते म्हणाले, ‘ राहुल गांधींना कोर्टाने माफी मागण्यास सांगितले, पण त्यांनी माफी मागितली नाही.जे काही घडले त्याला राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड