
महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांची शिवसेना (Shivsena) आणि राज ठाकरे (Raj thackrey) यांची मनसे (MNS), या दोघांची युती होऊन आगामी महापालिका निवडणुका लढणार अशा बातम्या गेल्या अनेक दिविसांपासून समोर येत आहेत.दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक आहे, मात्र राज वा उद्धव ठाकरे या दोघांनकडूनही अद्याप युतीची घोषणा झालेली नाही. सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू असून, लवकरच ठाकरे बंधू युतीची घोषणा करत जाहीरानामाही जाहीर करतील अशी माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही युतीबाबत स्पष्ट बोलले आहेत. तुम्हाला ज्या घोषणेची (युतीच्या) उत्सुकता आहे, ती घोषणा लवकरच होईल, असे राऊत यांनी नमूद केलं.
काय म्हणाले संजय राऊत ?
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जागावाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुंबई ही अतिशय महत्वाची आहे, कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल. कालही बराच वेळ मनसे आणि शिवसेनेचे नेते हे अंतिम चर्चेसाठी बसले, आज मुंबईचा विषय संपेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय ठाणे, डोंबिवली, पुणे, नासिक इथेही अंतिम टप्प्यात आहे चर्चा, येत्या 1-2 दिवसांत सगळं फायनल झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राज हे बसून बोलतील. तुम्हाला ज्या घोषणेची (युतीच्या) उत्सुकता आहे, ती घोषणा होईल.
आमचं घर दोघांचं आहे..
काही झालं तरी आमच्यात कोणताही विसंवाद, गोंधळ नाही, महा-महायुतीमध्ये जे चाललंयं, तसं आमच्याकडे अजिब्बात नाही. आमचं घर दोघांचं आहे अस म्हमत राऊतांनी टोला हाणला. आता काँग्रेस सोबत नाही, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा होईल. पण शिवसेना आणि मनसे हे मुख्य पक्ष आहेत, त्यांची आघाडी होईल. आणि हीच आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल. महाराष्ट्र आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल, असा विश्वासह राऊत यांनी व्यक्त केला.
एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधू ?
युतीची घोषणा केल्यावर ठाकरे बंधूंची ताकद दाखवण्यासाठी, राज व उद्धव हे दोघेही शिवाजी पार्क येथे एकत्रित सभाही घेऊ शकतात, शक्तीप्रदर्शन करू शकतात अशी चर्चा होती. मात्र ते दोघेही एकाच व्यासपीठावर दिसणार का असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हाही त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. “आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कितीतरी वेळा एकत्र आले आहेत ना, डोममधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र दिसले आहेत,एकमेकांच्या घरी गेले, एकत्र चर्चेला बसले. यापेक्षा अजून वेगळं काय म्हणायचं आहे ?” असा सवालच राऊत यांनी विचारला.