AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस्टर राज… टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. मात्र या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसांची आठवण करून देत त्यांना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं.

मिस्टर राज... टीकेनंतर सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; रमेश किनी हत्याकांडाचा उल्लेख करत म्हणाल्या...
| Updated on: May 13, 2024 | 10:09 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील कळव्यात जाहीर सभा पार पाडली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची आज ठाण्यात पहिली सभा पार झाली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे कळव्यात आले होते. या सभेत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. त्यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ दाखवत टीका केली. ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलने त्यांनी अंधारे यांच्यावरही निशाणा साधला.

मात्र त्यांच्या या टीकेला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्र दिलं आहे. रमेश ‘किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटीसांची आठवण करून देणारं एक ट्विटच अंधारे यांनी पोस्ट केलं. मी सोमवारी संध्याकाळी तुम्हाला उत्तर देईन, असंही त्या म्हणाल्या.

मिस्टर राज… काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?

सोशम मीडियावरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना सुनावलं. ‘X’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवरून ट्विट करत त्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

सुषमा अंधारे यांचं ट्विट त्यांच्याच शब्दांत जसच्या तसं…

मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. “शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात , माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली की शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली ?

फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल..

27 वर्षांपूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल? असा प्रतीसवालही सुषमा अंधारे यांनी केला.

पण असो माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना ? सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे, याची पोचपावती तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून रहायला हवा.! अशा शब्दांत अंधारे यांनी राज ठाकरेंना सुनावलं.

राज ठाकरेंनी काय केली होती टीका ?

कळव्यातील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी ठाकरे गटावर टीका केली. सुषमा अंधारे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांचा भाषणाचा एक जुना व्हिडीओ लावला. या व्हिडीओत सुषमा अंधारे या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत होत्या. ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या बाई, ७०-८० वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार दिल्यावर हात लटलटणार असं म्हणणारी ही बाई तिला तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्ते करता आणि बाळासाहेबांवर प्रेम आहे म्हणून सांगता?”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.

ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केल्यानंतर तुम्ही भुजबळांच्या मांडिला मांडी लावून बसता, तेव्हा माझ्या वडिलांना अटक करायला लावणाऱ्या माणसासोबत बसणार नाही असं वाटलं नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना