“पक्ष स्थापन केल्यानंतर…”, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त करताना आता तुम्हाला झोपून चालणार नाही. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे, असे म्हटले.

पक्ष स्थापन केल्यानंतर..., उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 2:45 PM

Uddhav Thackeray Criticise Raj Thackeray : विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. देवेंद्र फडणवीस यांनी २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातच आता घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त करताना आता तुम्हाला झोपून चालणार नाही. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे, असे म्हटले.

उद्याची मुंबई आपली राहणार आहे का?

जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर सगळे येतात. ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. यांनी (भाजपा) संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है म्हणत आहेत. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत केला.

कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत, जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जाते आहे. अशा वेळी आपण षंढ म्हणून हे बघत बसणार का? तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ नसतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात, होय शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे आजही तेच सांगतो आहे. फक्त आपली निशाणी बदलली आहे. निशाणी बदलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. उध्दवसाहेब तुम्हीच येणार आहे, असं मला लोक सांगत होते. मग आपली दांडी कशी पडली? आता आपल्याला झोपून चालणार नाही, कारण हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलथवून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडली आहे. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. योग्यवेळी तुम्ही मशाल हाती घेतली आहे, शिवसेनेचा भगावा हाती घेतला आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमच्या बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.