धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार

कोल्हापुरातील रायगड कॉलनीत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.

धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले बलात्कार
प्रातिनिधिक फोटो

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राला हादरून सोडणारी एक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. राज्यात कुठेही महिला सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे. कोल्हापुरातील रायगड कॉलनीत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. (Shocking A pregnant woman was raped by five men in different places)

मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेवर पाच वेळा बलात्कार करण्यात आला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे बलात्कार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून बाकीच्या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पीडित महिला आसामची आहे. तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचंही सांगण्यात येत आहे. मर्जीविरुद्ध पीडितेशी संबंध ठेवल्याप्रकरणी आता पोलिसांता गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Shocking A pregnant woman was raped by five men in different places)

संबंधित बातम्या – 

पुन्हा बलात्काराने महाराष्ट्र हादरला, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

(Shocking A pregnant woman was raped by five men in different places)

Published On - 7:54 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI