AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवड्या डोंगरावरुन आयफोनसाठी उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबद्दल हैराण करणारी माहिती, थेट..

आयफोन 15 साठी छत्रपती संभाजीनगरच्या कुणाल याने डोंगराहून उडू घेतली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडीलही डोंगराहून खाली पडले. डोळ्या देखत नवरा आणि मुलगा गेल्यानंतर आईनेही क्षणाचाही विचार न करता उडी घेतली.

खवड्या डोंगरावरुन आयफोनसाठी उडी मारणाऱ्या कुणालच्या वडिलांबद्दल हैराण करणारी माहिती, थेट..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 22, 2026 | 2:13 PM
Share

पन्नास हजारांच्या एका आयफोनसाठी एक अख्खं कुटूंब संपलं. ही दृश्यं तुम्हाला विचलीत करु शकतात. मात्र, एकीकडे जेनझींच्या आंदोलनानंतर तरुणवर्ग स्वतःबद्दल जागरुक असल्याचं कौतूक होत असताना दुसरीकडे काही मुलं चंगळवादाच्या किती आहारी गेली आहेत, त्याचं हे विदारक चित्र संभाजीनगरमधून समोर आलं. हा कुणाल चांदगुडे वय वर्ष 19 अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के गुण मिळवले… भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं., त्यासाठी तो नीटची तयारीही करत होता. मात्र भौतिकवस्तूंनी सुखसंपन्न व्हावं ह्या स्वभावापायी त्याच्यासह आई-वडिलांचाही जीव गेला. वडील ट्रकचालक होते आणि आई गृहिणी. घरात भांडून कुणाल कुणाल चांदगुडेने आयफोन घेतला.. वडिल ट्रकचालक असल्यानं कसे-बसे करुन त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली., मात्र पुढे त्याचेच हफ्ते बाऊन्स झाल्यानंतर पैशांवरुन त्याचा वडिलांशी वाद झाला… खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या पैशांवरूनही अनेकदा त्यांच्यात वाद होत होते.

त्याच रागातून आत्महत्येसाठी कुणाल तिसगावच्या खवल्या डोंगरावर जावून कड्यावर उभं राहिला… स्थानिक लोक त्याला जीवाचं बरं-वाईट करु नको विनवण्या करत होते. काही वेळातच कुणालचे आई-वडिलही तिथं पोहोचले. त्यांनी पोराच्या गयावया सुरु केल्या… मुलगा मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता… तुझे वडिलांसोबत वाद आहेत तर मी वेळ पडली तर त्यांनाही सोडेल, पण तू सोडून जावू नकोस म्हणून आई जीवाच्या आकातानं सांगत होती..

मुलगा डोंगराच्या अत्यंत कडेवर उभा होता… अनेक वेळ समजवूनही तो पुढे येत नसल्यानं अखेर वडील पुढे गेले. त्यांनी मुलाला हात धरुन पुढे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलानंही हात मागे खेचल्यानं तोल जावून मुलगा आणि वडिल दोघांचाही कोसळून मृत्यू झाला…हा सारा प्रकार पाहून प्रत्यक्षदर्शी धक्क्यातून सावरत नाही, तोच अजून एक धक्कादायक घटना घडली. डोळ्यादेखत तरुण मुलगा आणि पतीचाही कोसळून मृत्यू झाल्यानंतर मुलाच्या आईनंही त्याच डोंगरावरुन उडी टाकत स्वतःला संपवून घेतलं.

पन्नास-साठ हजाराच्या एका आयफोनसाठी एक मध्यवर्गीय कुटुंब संपलं…ट्रकचालक असूनही मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी बाप झटत होता. आई गृहिणी म्हणून घर चालवत होती. पण त्याच फोनच्या हट्टानं अख्खं कुटुंब गिळंकृत केलं…. अपवाद वगळता आत्ताची अनेक मुलं अभ्यासात अत्यंत हुशार आहेत… तरी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरची जाण मात्र लोप पावत चाललीय…आयफोनच्या हट्टात आंधळ्या झालेल्या मुलाला ट्रकचालक बापाची व्यथा आणि आपल्या आईची घुसमटही दिसू नये., ही शोकांतिका आहे…

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?