AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेळता खेळता अटॅक आला, आईच्या मांडीवर डोकं ठेवलं अन् जीव गेला… 10 वर्षाच्या मुलासोबत नियतीचा क्रूर खेळ!

नुकताच एक मनाला चटका लावून जाणारी बातमी पुढे आलीये. एका 10 वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता जीव गेला. खेळून थकल्यानंतर हा मुलगा आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवत होता आणि त्यावेळी नियतिने मोठा खेळ केला.

खेळता खेळता अटॅक आला, आईच्या मांडीवर डोकं ठेवलं अन् जीव गेला... 10 वर्षाच्या मुलासोबत नियतीचा क्रूर खेळ!
Shravan Gawade
| Updated on: Sep 05, 2025 | 4:21 PM
Share

गणेशोत्सवाच्या काळात एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली येथे घडलीये. गणेशोत्सवाची धावपळ सुरू होती. संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते. मात्र, एका आईचा आक्रोश ऐकून संपूर्ण गाव हादरले. हृदयविकाराच्या धक्क्याने दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला. आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण खेळत होता. मस्त धमाल मस्ती करत होता. खेळून खेळून दमल्यानंतर तो आपल्या आईकडे गेला आणि चक्क आईच्याच मांडीवर त्याने जीव सोडला. खेळता खेळता आईच्या मांडीवरच श्रावण गावडे याने प्राण सोडले.

आईच्या मांडीवर श्रावणने सोडला जीव

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली येथील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेली अधिक माहिती अशी की, मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण गावडे हा खेळत होता. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो मध्येच खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र, आईच्या मांडीवर डोके टेकवले आणि  श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आईला काही कळण्याच्या आतच श्रावण याने जीव सोडला.

खेळता खेळता दमला आणि..

मुलगा काहीच हालचाल करत नसल्याचे आईच्या लक्षात आले आणि तिने एकच हंबरडा फोडला. श्रावणच्या आईचा आवाज ऐकून लोकांनी लगेचच तिकडे धाव घेतली. वेळ अजिबात न घालता श्रावण याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून श्रावणचे निधन झाल्याचे स्पष्ट केले आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली. कोणालाच विश्वास बसत नव्हता की, आताच गणपतीच्या मंडपात खेळत मजा मस्ती करणारा श्रावण हा आपल्यात राहिला नाही.

गावडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

श्रावणच्या निधनानंतर गावडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. हेच नाही तर चार वर्षांपूर्वीच श्रावणच्या बहिणीचे देखील निधन झाले होते. आता त्या गोष्टीला चार वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच गावडे श्रावण अटॅकने गेला. कुटुंबियांना श्रावणच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. डोळ्यासमोर मंडपात उड्या मारत आपल्या मित्रांसोबत खेळत असलेला श्रावण निघून गेल्याने कुटुंबियांच्या मनाला मोठा चटका बसला आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.