AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमविवाहाचा भयंकर शेवट, पुन्हा सैराटची पुनरावृत्ती, हळदीसाठी आलेल्या मुलीसह जावयावर सासऱ्याचा…

जळगावमधील चोपडा येथे एका निवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्या मुलीची गोळीबार करून हत्या केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रेमविवाहामुळे वडिलांना राग आला होता. बहिणीच्या हळदी समारंभात आलेल्या मुलीवर वडिलांनी गोळीबार केला. यात मुलीचा मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रेमविवाहाचा भयंकर शेवट, पुन्हा सैराटची पुनरावृत्ती, हळदीसाठी आलेल्या मुलीसह जावयावर सासऱ्याचा...
jalgaon crime
| Updated on: Apr 27, 2025 | 7:49 AM
Share

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ‘सैराट’ची पुनरावृत्ती घडली आहे. जळगावातील चोपडा शहरात एका सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तृप्ती अविनाश वाघ (२४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती अविनाश वाघ यांच्या पाठीत गोळी घुसली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडील किरण मंगले यांना मान्य नव्हता. अविनाशच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी तृप्ती आणि अविनाश चोपडा येथे आले होते. किरण मंगले यांना मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात होता. हाच राग मनात धरून आलेल्या किरण मंगले यांनी तृप्ती आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी तीन राउंड फायर केले. यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश यांच्या पाठीला गोळी लागली. तर दुसरी गोळी हाताला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करुन हा गोळीबार केला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी किरण मंगले यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच यानंतर अविनाशलाही जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चोपडा शहरात खळबळ

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी किरण यांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. तसेच वाघ यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....