Shrimant Shahu Chhatrapati : शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचा आनंद, संभाजी छत्रपतींच्या वडिलांकडून संजय पवारांचं अभिनंदन

Shrimant Shahu Chhatrapati : शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचा आनंद, संभाजी छत्रपतींच्या वडिलांकडून संजय पवारांचं अभिनंदन
संभाजी छत्रपतींच्या वडिलांकडून संजय पवारांचं अभिनंदन
Image Credit source: tv9 marathi

Shrimant Shahu Chhatrapati : संभाजी पवार हा अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे. ते अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करत आहेत. अशा कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली. त्याबद्दल आपल्याला आनंदच आहे, असं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी म्हटलं आहे.

भीमराव गवळी

|

May 28, 2022 | 4:41 PM

कोल्हापूर: शिवसेनेने स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना उमेदवारी नाकारत शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी मात्र, पवार यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने (shivsena) संधी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी संभाजी पवार यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसेच त्यांनी संभाजीराजे यांचे कानही टोचले. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. ही संभाजीराजेंची राजकीय भूमिका होती. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती, असं श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी म्हटलं आहे.

संभाजी पवार हा अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे. ते अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करत आहेत. अशा कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली. त्याबद्दल आपल्याला आनंदच आहे, असं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेने दिलेला शब्द फिरवलाय असं म्हणता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

त्या खेळीमागे फडणवीसच

संभाजी छत्रपती यांनी अपक्ष उभं राहण्याची खेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचीच होती, असा दावाही त्यांनी केला. बहुजन समाजातील मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने संभाजीराजेंना उमेदवारी देण्याची खेळी केली, असंही त्यांनी सांगितलं.

त्या ऑफरलाही नकार होता

संभाजीराजेंना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवायचे होते. त्याला आमचा विरोध होता. आम्ही त्यांना ती ऑफर न स्वीकारण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी जे जे निर्णय घेतले, त्याविषयी आमच्याशी चर्चा करण्यात आली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सर्वच राजकीय पक्षांनी सन्मान केला

संभाजीराजेंना वैयक्तिकरित्या उमेदवारी नाकरली आहे. त्याचा घराण्याशी संबंध नाही. छत्रपती घराण्याचा सर्वच राजकीय पक्षांनी सन्मान केला आहे, अशा शब्दात त्यांनी संबाजीराजेंचे कान टोचले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें