AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal : अखेर सिया-चेतनचा तो व्हिडीओ आला, केतनला मारण्याआधी हातात हात घालून…पाहून धक्काच बसेल!

केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचा कट पुण्यातील एका कॉफी शॉपमध्ये रचण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. या कटाचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Ketan Agarwal : अखेर सिया-चेतनचा तो व्हिडीओ आला, केतनला मारण्याआधी हातात हात घालून...पाहून धक्काच बसेल!
siya goel and ketan agarwal caseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2026 | 5:32 PM
Share

Ketan Agarwal Murder Case : राज्यासह संपूर्ण देशात सध्या पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करायचे असल्याने सिया गोयलने त्याच्या हत्येचा कट रचला होता. याच कटानुसार केतन अग्रवालला पुण्यातील लोहगडावर नेऊन त्याला सिया तसेच त्याच्या बॉयफ्रेंडने ढकलून दिले. यातच केतनचा मृत्यू झाला. लवकरच केतन आणि सिया यांचे लग्न होणार होते. या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड यांना अटक करण्यात आले आहे. दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. नुकतेच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी कट रचण्यात आला. हा कट रचण्यासाठी कोणालाही संशय येऊ नये असे स्थान निवडण्यात आले होते..

सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे तपासण्यास सुरुवात

केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचा कट पुण्यातील एका कॉफी शॉपमध्ये रचण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. या कटाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या धाग्याच्या आधारे पोलिसांचे पथक पुण्यातील कॅफेमध्ये दाखल झाले असून तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींनी कॅफेमध्ये कोणाला भेट घेतली, किती वेळ थांबले आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि इतर माहितीची बारकाईने छाननी सुरू असून या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जीव बॉयफ्रेंडमध्ये अडकला

दरम्यान, सियाने केतनचा खून केल्याचे कबुल केल्याचे म्हटले जात आहे. केतन अग्रवाल हा कोट्यधीश आहे. त्याची संपत्ती एकूण 600 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. केतनचेही सियावर खूप प्रेम होते. तिच्या बर्थडेसाठी केतनने जंगी सेलिब्रेशन आयोजित केले होते. परंतु सियाचा जीव तिच्या बॉयफ्रेंडमध्ये अडकला होता. म्हणून तिने केतनचा काटा काढल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. त्यामुळे आता आणखी काय काय धक्कादायक खुलासे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?