AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाचा आव हत्येचा डाव! गडावरील वॉचमनने दिली मोठी माहिती, सिया-चेतनने नको ते कृत्य केलं

Ketan Agarwal Case: सध्या संपूर्ण देशात केतन अग्रवाल हत्याकांडाची चर्चा सुरु आहे. सियाने कट रचून केतनची हत्या केली. या कटात तिच्यासोबत तिच्या बॉयफ्रेंड चेतन देखील सहभागी होता. ज्या गडावरुन केतनला ढकलण्यात आले तेथील वॉचमनने खळबळजनक माहिती दिली आहे.

प्रेमाचा आव हत्येचा डाव! गडावरील वॉचमनने दिली मोठी माहिती, सिया-चेतनने नको ते कृत्य केलं
सिया गोयलImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 25, 2026 | 5:10 PM
Share

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची धकलून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. केतनची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलनेच केल्याचे समोर आले आहे. सियाने बॉयफ्रेंडसोबत मिळून भयानक कट रचला आणि केतनला किल्ल्यावरुन धक्का दिला. उंचावरुन खाली कोसळल्यामुळे केतनचा मृत्यू झाला. या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा होताना दिसत आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. केतन आणि सिया ज्या लोहगड किल्ल्यावर गेले होते तेथील वॉचमनने काही गोष्टी पाहिल्या. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत.

काय म्हणाला सुरक्षा रक्षक?

लोहगडचा जो वॉचमन म्हणजे सुरक्षा रक्षक आहे त्याने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या सुरक्षारक्षकाने म्हटले की सिया आणि केतन यांचे लोहगडवर तिकिट काढण्यात आले नव्हते. कारण, तेथे नेटवर्क नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा परत याल तेव्हा पैसे द्या. सोबत स्कॅनचा फोटो जो आहे तो घेऊन जाण्यास सांगितला होता. हे दोघे गडावर गेल्यानंतर काही वेळातच चेतन सुद्धा गडावर आला होता. त्याने हूडी घातले होते. कानात हेडफोन होते आणि तो तिकिट काऊंटरकडे न बघताच पुढे गेला. जेव्हा मी त्या हटकलं तेव्हा तो म्हणाला, मी वरुन जेव्हा खाली येईन तेव्हा मी तुमचे पैसे पे करेन. पण ही जी घटडली. खून झाल्यानंतर तो गडावरुन खाली आला. पण तो काऊंटरकडे न जाता, तिकिटाचे पैसे न देता तेथून पळून गेला होता अशी माहिती वॉचमनने दिली आहे.

वडिलांची सहमती नसताना

वॉचमनने दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं, केतनच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला हे समोर आले आहे. केतनने लोहगडवर जावू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, सियाने जाण्याचा हट्ट धरल्यामुळे केतन लोहगडवर गेला होता. दुसऱ्याच दिवशी सियाचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी दोन्ही कुटुंबिय महाबळेश्वरला जाणार होते. त्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये बुकींग करण्यात आली होती. पण सियाने एक दिवस आधीच केतनला संपवण्याचा प्लान केला होता. त्यामुळे तिने वाढदिवशी केतनसाठी एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती.

ओळख कशी झाली?

केतन विशाल अग्रवाल आणि सिया गोयल यांचे नाते कर्नाटकातील गुलबर्गा येथे एका समाजातील लग्नसमारंभात नातेवाईकांच्या मध्यस्थीने झाले. त्या वेळी दोघांच्या लग्नाचा विषय प्रथमच चर्चेला आला. सियाचे वय केवळ २० वर्षे असल्याने अग्रवाल कुटुंबीयांनी सुरुवातीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र गोयल कुटुंबीयांच्या सततच्या आग्रहामुळे आणि हट्टामुळे ते शेवटी तयार झाले. त्यानंतर दोघांच्या लग्नाची बोलणी झाली आणि १९ फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा पार पडला. २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न ठरले होते आणि त्यासाठी हॉटेल किंवा हॉलची पहाणीही सुरू झाली होती.

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?