AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमधूनच उमेदवारीला विरोध, आमदार प्रणिती शिंदे म्हणतात…

काँग्रेसच्या माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी शहर मध्य मतदारसंघ (Solapur central vidhansabha) मुस्लीम बहुल असल्याने काँग्रेसने मुस्लीम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. पण प्रणिती शिंदे यांनी हा विरोध फेटाळून लावलाय.

काँग्रेसमधूनच उमेदवारीला विरोध, आमदार प्रणिती शिंदे म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jul 29, 2019 | 5:55 PM
Share

सोलापूर : एकीकडे पक्षाला गळती लागलेली असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत कहल देखील समोर येत आहेत. सोलापूर शहरात असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. सोलापूर मध्य मतदारसंघातून (Solapur central vidhansabha) आपण निवडणूक लढवणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. काँग्रेसच्या माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी शहर मध्य मतदारसंघ (Solapur central vidhansabha) मुस्लीम बहुल असल्याने काँग्रेसने मुस्लीम उमेदवारालाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. पण प्रणिती शिंदे यांनी हा विरोध फेटाळून लावलाय.

दुसरीकडे काँग्रेसची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोची समाजानेही मोची समाजाला उमेदवारी देण्याची मागणी करत आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविला होता. आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण शहर मध्य मधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. या मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकाकडे मुलाखतही प्रणिती शिंदे यांनी दिली. मुलाखत दिल्यानंतर त्या बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्या दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचे दुष्परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. कालपर्यंत शिंदे यांचा शब्द पाळणारे कार्यकर्ते आता त्यांच्यावर भलतेच नाराज झाले आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणी काहीशा  वाढल्या असून त्यांच्या विरोधात राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.

मुस्लीम उमेदवाराला डावललं जात असल्याचा आरोप

शहर मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मुस्लीम मतदार संख्या आहे. मात्र असं असताना प्रत्येक वेळी मुस्लीम समाजाला डावललं जात असल्याचा आरोप काँग्रेसमधूनच केला जातोय. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःहून मतदार संघ सोडावा आणि मुस्लीम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे करण्यात आली आहे.

पक्षात अनेक निष्ठावंत असताना आणि सक्षम उमेदवार असतानाही 2009 मध्ये अनेकांना डावलून नवख्या असलेल्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली गेली. तरीही मुस्लीम समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. 2009 आणि 2014 च्या दोन्ही निवडणुकीत प्रणिती शिंदेंना निवडून आणण्यात मुस्लीम समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे यंदा उमेदवार मुस्लीम समाजाचाच असायला हवं असा आग्रह मुस्लीम नेत्यांनी धरला आहे. इतकच काय प्रणिती शिंदेना दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

मोची समाजाकडूनही काँग्रेसवर दबाव

एकीकडे मुस्लीम समाजाने आमदार प्रणिती शिंदेच्या शहर मध्यवर दावा केलेला असतानाच मतदार संघातील क्रमांक दोनवर असणाऱ्या आणि काँग्रेसची मोठी वोट बँक असणाऱ्या मोची समाजाने सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह केला आहे. त्यासाठी मोची समाजाचे बैठकावर बैठकाचे सत्र सुरूच आहे ,

सोलापूर शहरातील विधानसभेच्या 3 जागांपैकी शहर उत्तर हा जणू भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातून निवडणूक लढायला कोणीही धजावत नाही. तर तिकडे दक्षिण मतदारसंघात सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी चांगलंच बस्तान बांधलंय. उरलेल्या शहर मध्यच्या जागेवर आता या काँग्रेसजनांनी बंडाचा इशारा दिल्यामुळे आमदार प्रणिती  शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय कौशल्य वापरून शिंदे त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.