सोलापुरात कोरोना मृतांची संख्या 40 ने वाढून 217 वर, लपवाछपवी प्रकरणी रुग्णालयांना नोटीस

सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृतांच्या माहितीचीच लपवाछपवी झाल्याचं उघड झालं आहे (Hospitals in Solapur hide Corona death information).

सोलापुरात कोरोना मृतांची संख्या 40 ने वाढून 217 वर, लपवाछपवी प्रकरणी रुग्णालयांना नोटीस
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 1:55 PM

सोलापूर : राज्यातील कोरोना संसर्गाच्या काही मोठ्या हॉटस्पॉटमध्ये सोलापूरचा समावेश आहे. अशा सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृतांच्या माहितीचीच लपवाछपवी झाल्याचं उघड झालं आहे (Hospitals in Solapur hide Corona death information). सोलापूरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या तब्बल 40 मृतांची माहिती विविध रुग्णालयांनी प्रशासनाला दिलीच नाही. सिव्हिल हॉस्पिटलसह 8 रुग्णालयांनी सरकारच्या निर्देशानुसार एस. एल. पी. अ‍ॅपवर माहिती भरलीच नाही.

प्रशासनापासून माहिती लपवणाऱ्या रुग्णालयांमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, अश्विनी रुग्णालय, मार्कनडेय रुग्णालयासह 8 रुग्णालयांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची माहिती लपवल्याप्रकरणी महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने या आठही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. विशेष म्हणजे महानगर पालिकेकडून पाठपुरावा करणाऱ्या अधिकाऱ्यानीही या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. सध्या सोलापूर शहरातील मृतांची संख्या 217 वर पोहचली आहे, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

“सोलापूरकरानो शिस्त पाळा, अन्यथा  लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही” 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शारीरिक अंतर ठेवणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. मात्र, सोलापूरकरांकडून या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं समोर येत आहे. शिस्त पाळली जात नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अखेर सोलापूर आयुक्तांनी नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सोलापूरकरानो शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय उरणार नाही, अशा शब्दात त्यांनी हा इशारा दिला.

संसर्ग टाळायचा असेल, तर सरकारने केलेल्या नियमांचं पालन होणं आवश्यक आहे. शहरात नियम पाळले जात नाहीत. नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नियम आणि शिस्त पाळले जात नाही. जर हे असंच सुरु राहिलं तर आयुक्त शिवशंकर यांनी लॉकडाऊनसाठी सरकारकडे शिफारस करणार असल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या :

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

Corona Medicine : औरंगाबादच्या होलसेल मेडिकलमध्ये फेबीफ्लूचे औषध दाखल

नागपूरसाठी दिलासादायक बातमी, मेयो-मेडिकलमध्ये 339 पैकी 309 कोरोना रुग्णांना एकही लक्षण नाही

झोपडपट्टया नाही, मुंबईत आता इमारतींमध्ये ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

Hospitals in Solapur hide Corona death information

Non Stop LIVE Update
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.