खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक

भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble) 

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांच्या अडचणीत वाढ, बनावट जातीचा दाखला बनवणाऱ्याला अटक
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:36 PM

सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. शिवसिद्ध बुळा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. यानंतर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी जातीचा बनावट दाखल तयार केला होता. हा बनावट दाखला बनवणाऱ्या शिवसिद्ध बुळा याला पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसिध्द बुळा याने शिवाचार्य यांचा जातीचा बनावट दाखला तयर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात वैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे आपली खासदारकी वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचं जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरविलं आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. मात्र आता खासदार महोदयांनी जात प्रमाणपत्रासंदर्भात वेगळीच तक्रार दिली आहे. अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार, खासदारांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वळसंग पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोलापूर लोकसभा निवडणूक

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाही महास्वामींनी पराभवाची धूळ चारली होती. जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत ते ‘जायंट किलर’ ठरले होते. (Solapur Mp Jay Siddheshwar Swami in trouble)

संबंधित बातम्या : 

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

महाराष्ट्रातील भाजप नेत्यावर खासदारकी रद्द होण्याची टांगती तलवार

प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला, जयसिद्धेश्वर शिवाचार्यांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.