AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संकटमोचक’ गिरीश महाजन डॅमेज कंट्रोलसाठी सोलापुरात, पण…, भाजपला हे नाराजीनाट्य महागात पडणार?

सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहे. भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे मोहिते पाटील गट नाराज झालाय.

'संकटमोचक' गिरीश महाजन डॅमेज कंट्रोलसाठी सोलापुरात, पण..., भाजपला हे नाराजीनाट्य महागात पडणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 17, 2024 | 6:31 PM
Share

सोलापूर | 17 मार्च 2024 : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आज अकलूज येथे त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावलेली. या बैठकीला फलटणचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी भाजपला परिणाम भोगावे लागणार, अशा इशारा दिला. या सर्व घडामोडींनंतर भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले नेते गिरीश महाजन हे सोलापूरच्या अकलूज येथे दाखल झाले. धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यसाठी ते अकलूजला आले. पण ते मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्याबाहेर दाखल झाले तेव्हा त्यांच्यासमोर मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला बघायला मिळतोय. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा अस्वस्थ झालाय. दोन दिवसांपासून अकलूजमध्ये घडामोडी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे आज शिवरत्न बंगल्यावर सकाळी भाजपविरोधात बैठकही पार पडल्याची चर्चा आहे. तसेच धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हाच असंतोष गिरीश महाजन शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले तेव्हा बघायला मिळाला. कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. माढ्याचे खासदार धैर्यशील पाटील अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली.

संकटमोचक डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गटाची सोलापूर जिल्ह्यात चांगली ताकद आहे. त्यामुळे त्यांची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही. भाजपने याबाबतचा संभाव्य धोका लक्षात ठेवून मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अकलूजला पाठवलं आहे. गिरीश महाजन आता धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते मोहिते पाटलांची समजूत काढण्यात यशस्वी झाले तर भाजपला मोठा दिलासा मिळेल. अन्यथा लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसू शकतो. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार