AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपला परिणाम भोगावे लागतील’, माढ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस? नाराजीनाट्य कुठपर्यंत जाणार?

माढ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचं आता स्पष्ट होत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोठे नेते उपस्थित होते.

'भाजपला परिणाम भोगावे लागतील', माढ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस? नाराजीनाट्य कुठपर्यंत जाणार?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 17, 2024 | 5:21 PM
Share

सोलापूर | 17 मार्च 2024 : भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांमध्ये माढ्याचे सध्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण या निवडणुकीसाठी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील हे देखील इच्छुक आहेत. त्यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करत लोकसभा निवडणुकीसाठी शड्डूही ठोकला होता. पण भाजपकडून रणजितसिंह यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धैर्यशील मोहीत-पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आज अकलूज येथे त्यांच्या शिवरत्न बंगल्यावर बैठक बोलावली. मोहिते पाटील यांना उमेदवारी न दिल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या समर्थकांनी दिलाय.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून माढा लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील गट नाराज झालाय. मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आज मोहिते पाटील नक्की काय भूमिका घेतात आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात हे पाहणे महत्वाचं मानलं जात होतं.

बैठकीला दिग्गज नेत्यांची हजेरी

बैठक सुरु होण्याआधी या बैठकीला फलटणचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत होती. त्यानुसार हे दिग्गज नेते देखील बैठकीला हजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह उर्फ बाळ दादा मोहिते पाटील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर मोहिते पाटील यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

‘भाजपला परिणाम भोगावे लागणार’, कार्यकर्त्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया

“गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यांनी निंबाळकरांना निवडून दिलं होतं. भाजपने आता यावेळेस मोहिते पाटलांना तिकीट न देवून खूप मोठी चूक केली आहे. याचा परिणाम तीन मतदारसंघांमध्ये दिसणार आहे. बारामती, सोलापूर आणि माढा या मतदारसंघांमध्ये त्याचा परिणाम भाजपला भोगावा लागेल”, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली. तर “मोहिते पाटलांनी असं काय केलं होतं की त्यांना तिकीट दिलं नाही? आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आम्ही भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील चार मतदारसंघांमध्ये खूप मोठा परिणाम भोगावा लागणार आहे”, अशी प्रतिक्रिया मोहिते पाटील यांच्या दुसऱ्या समर्थकाने दिली.

Follow Us
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...