AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lokmangal Biotech : लोकमंगल बायोटेकसह सहा कंपन्यांवर केंद्राकडून फौजदारी कारवाईचे आदेश; आमदार सुभाष देशमुखांना झटका

केंद्रीय शासनाने ठरवलेल्या प्रमाणानुसार या खतांचे उत्पादन झालेले नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे हे खत अप्रमाणित ठरवण्यात आले आहे. पुढील कारवाई संदर्भात केंद्राकडून कोणत्याही सूचना आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

Lokmangal Biotech : लोकमंगल बायोटेकसह सहा कंपन्यांवर केंद्राकडून फौजदारी कारवाईचे आदेश; आमदार सुभाष देशमुखांना झटका
लोकमंगल बायोटेकसह सहा कंपन्यांवर केंद्राकडून फौजदारी कारवाईचे आदेशImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 4:56 PM
Share

सोलापूर : अप्रमाणित मिश्र खतांच्या विक्री (Sale of Compound Fertilizers) प्रकरणी राज्यातील सहा कंपन्यांसह भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेक (Lokmangal Biotech) कंपनीवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित रासायनिक मिश्र खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने आठ राज्यांमध्ये धाडी (Raid) टाकल्या. यामध्ये महाराष्ट्रातील सहा कंपन्यांची मिश्र खते देखील अप्रमाणित आढळून आले आहेत. माजी मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समुहाशी संबंधित असलेल्या लोकमंगल बायोटेक कंपनीसह सांगलीतील वसंत अँग्रो टेक, नागपूर येथील विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर्स या संस्थांचा यामध्ये समावेश आहे.

कारवाईचे आदेश देणारे पत्र राज्याला पाठवण्यात आल्याची माहिती

2019 मध्ये तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी लोकमंगलवर फौजदारीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारतर्फे राज्यातील या सहा संस्थावर कारवाईचे आदेश देणारे पत्र राज्याला पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तसेच या पत्रात केंद्राच्या एकात्मिक खते व्यवस्थापन प्रणालीतून अनुदानावर खते विकत घेण्याचा लोकमंगलचा परवाना तात्काळ रद्द करावा. शेतकऱ्यांना अप्रमाणि खते विकणाऱ्या या कंपनीविरोधात पोलिसांकडे एफआयआर दाखल करावी, अशा सूचना केंद्राने पत्राद्वारे कळवल्याचे वृत्त आहे.

केंद्राकडून लोकमंगलच्या खतांचीही तपासणी करण्यात आली

दरम्यान केंद्राकडून लोकमंगलच्या खतांची तपासणी झाली होती. त्यात ते अप्रमाणित असल्याने निष्पन्न झाले असले तरी अद्याप कारवाई संदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती सोलापूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. मात्र लोकमंगल तर्फे निर्मिती करण्यात आलेले 18:18:10 हे मिश्र खत अप्रमाणित आढळून आले आहे. 30 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय पथकाने या खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. फरिदाबाद येथील शासकीय प्रयोगशाळेत या नमुन्याची तपासणी करण्यात आली. सदर खताच्या नमुन्याचे विश्लेषण आमच्या क्वॉलिटी कंट्रोल विभागाला प्राप्त झाले आहे. 18:18:10 ग्रेडच्या खतामध्ये मुलद्रव्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. नायट्रोजनचे प्रमाण हे 18 ऐवजी 16.61, फॉस्परसचे प्रमाण 18 ऐवजी 14.18 तर पोटॅशचे प्रमाण मात्र 10 ऐवजी 20.88 इतके आढळून आले आहे.

सुभाष देशमुखांवर कारवाई करण्याचे आदेश

केंद्रीय शासनाने ठरवलेल्या प्रमाणानुसार या खतांचे उत्पादन झालेले नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे हे खत अप्रमाणित ठरवण्यात आले आहे. पुढील कारवाई संदर्भात केंद्राकडून कोणत्याही सूचना आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. दरम्यान लोकमंगलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम लोकमंगलचे सर्वेसर्वा आणि सुभाष देशमुख हे करत असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अप्पाराव कोरो यांनी केली आहे. (Center orders criminal action against six companies including Subhash Deshmukhs Lokmangal Biotech)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.