AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडी एकत्र लढली तर ठीक, अन्यथा… राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंची भूमिका

माढा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात आमदार बबनराव शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकहाती सत्ता हाती असताना देखील अशी भूमिका घेतल्याने आमदार शिंदे यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढली तर ठीक, अन्यथा... राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंची भूमिका
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेंचं महाविकास आघाडीबाबत वक्तव्य
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 4:17 PM
Share

सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या (Solapur Elections) आधीच सोलापुरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सोबत येऊन एकत्रित लढली तर ठीक, अन्यथा आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू, अशी भूमिका बबनदादांनी मांडली आहे. माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथे ऑक्सिजन पार्कच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. बबनदादा शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार (Madha NCP MLA) आहेत. 1995 पासून बबनदादा सलग सहा वेळा आमदार असून त्यापैकी पाच वेळा त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर बाजी मारली आहे.

काय म्हणाले बबनदादा शिंदे?

“यंदा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली आणि पक्षश्रेष्ठींनी तसे आदेश दिले, तर स्थानिक पातळीवर युती होऊ शकते. जर युती झालीच नाही तर आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवणार” असे आमदार बबनदादा शिंदे यांनी म्हटले आहे.

बबनदादांचे एकहाती वर्चस्व

माढा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात आमदार बबनराव शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकहाती सत्ता हाती असताना देखील आमदार शिंदे यांनी युती झाली तर सोबत जाऊ, नाही तर स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची देखील भूमिका घेतल्याने आमदार शिंदे यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

शरद पवारांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माढ्यात येणार

माढा पंचायत समिती कार्यालयाच्या जवळपास 4 कोटी रुपयांच्या निधीतून उभा केलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच माजी आमदार आणि सहकार महर्षी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभास राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निमंत्रण दिले असल्याचेही आमदार बबनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या :

शरद पवारांनी दखल न घेतल्याने नाराजी, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील सपत्नीक काँग्रेसमध्ये

आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, अनिल परब यांच्या वक्तव्यानं कदम-दळवी वाद वाढणार?

सरकारमधील मित्रपक्ष ठाण्यात बनले शत्रूपक्ष? सेना-राष्ट्रवादी आमनेसामने, वाद चिघळणार?

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.