AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कांद्याने भरलेला मिनी ट्रक पलटला; तरीही दुचाकीस्वार जागेवरच पडला

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी ट्रक पलटला. त्यामुळे मिनी ट्रकमधील कांदे रस्त्यावर पडले. कांद्याची पोती रस्त्यावर पडून होती. काही जणांनी हे कांदे उचलून नेले.

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कांद्याने भरलेला मिनी ट्रक पलटला; तरीही दुचाकीस्वार जागेवरच पडला
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 17, 2023 | 10:28 AM
Share

सोलापूर : जिल्ह्यातील देगाव येथे मोठा अपघात झाला. हा अपघात मिनी ट्रक (Mini truck) आणि दुचाकी यांच्यात झाला. अपघात एवढा मोठा होता की, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात मिनी ट्रक पलटला. त्यामुळे मिनी ट्रकमधील कांदे रस्त्यावर पडले. कांद्याची पोती रस्त्यावर पडून होती. काही जणांनी हे कांदे उचलून नेले. कांद्याची पोती रस्त्यावर पडली होती. दुसरीकडं दुचाकीस्वारही (bike rider) पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. हॉटेल समुद्धी गार्डनसमोर हा अपघात झाला. मिनी ट्रक भरधाव वेगाने जात असल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमा झाली. हा अपघात पाहण्यासाठी लोकं आले.

solapur 1 n

दुचाकीस्वार जागेवरच गेला

सोलापूरजवळील देगाव येथे कांद्याने भरलेल्या मिनी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय. या अपघातात मोटर सायकलस्वार जागीच ठार झाल्याची माहिती समोर आलीय. सोलापूर शहराजवळ असलेल्या देगाव येथे हॉटेल समृद्धी गार्डन समोर हा अपघात झालाय. नारायण फडतरे असे मृत पावलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव आहे.

कांद्याने भरलेला मिनी ट्रक पलटला

सोलापूरजवळील देगाव येथे रात्री कांद्याने भरलेला मिनी ट्रक दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. मिनी ट्रकची दुचाकीला जबर धडक लागल्यामुळे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. कांद्याने भरलेला ट्रक जाग्यावरच पलटी झाला होता. त्यामुळे सर्व रस्त्यावर कांद्याचे पोते पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.

कांदा उत्पादकांचे नुकसान

मिनी ट्रकमध्ये कांदे होते. ते पोत्यांमध्ये भरून दुसरीकडे नेण्यात येत होते. आधीचं कांद्याला भाव नाही. त्यात मिनी ट्रक पलटल्याने ट्रकसह कांद्यांचेही नुकसान झाले. कांदा उत्पादक आणि मिनी ट्रक या दोघांचेही नुकसान झाले. दुसरीकडं या दुचाकीस्वाराचा जीव गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नारायण फडतरे हा युवक होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांनी मोठी हानी झाली आहे. अपघाती ठार होईल, याची कुणी कल्पना केली नव्हती. मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?