Solapur Supriya Sule : ‘ऑपरेशन परिवर्तन’ कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचाही सार्थ अभिमान; सोलापुरात सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमनं

| Updated on: Apr 20, 2022 | 12:03 PM

ऑपरेशन परिवर्तन उपक्रम कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचा (Police) मला सार्थ अभिमान असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते न यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.

Solapur Supriya Sule : ऑपरेशन परिवर्तन कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचाही सार्थ अभिमान; सोलापुरात सुप्रिया सुळेंकडून स्तुतीसुमनं
ऑपरेशन परिवर्तन कार्यक्रमात सहभागी सुप्रिया सुळे
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : ऑपरेशन परिवर्तन उपक्रम कौतुकास्पद असून महाराष्ट्र पोलिसांचा (Police) मला सार्थ अभिमान असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. खासदार सुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनच्या उपक्रमाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते न यांनी हा अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला त्यांनी भेट तर दिलीच. मात्र या उपक्रमाचे सुळेंनी लोकसभेतही कौतुक केले होते. या उपक्रमानुसार हातभट्टी दारू (Liquor) तयार करणाऱ्या महिलांच्या हातात शिलाई मशीन आले आहे. यासह विविध बदल या महिलांच्या जीवनात आले आहेत, ते स्वागतार्ह असल्याचे सुळे म्हणाल्या. या उपक्रमाचे कौतुक करताना पोलिसांनाही त्यांनी एकप्रकारचे बळ देत त्यांचेही कौतुक केले.

‘जिथे जिथे चांगली कामे होतात, त्याची नोंद घेतली पाहिजे’

कोणत्याही लोकप्रतिनिधीचा त्याच्या धोरणामुळे परिवर्तन होत असेल तर निश्चितच ते आनंददायी असते, असे या उपक्रमाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या. जिथे जिथे चांगली कामे होतात, त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

‘महाराष्ट्राचा पोलीस जबाबदार’

मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. कुठेही फिरताना मला अजिबात भीती वाटत नाही. कारण राज्याचा पोलीस जबाबदार आहे. त्यांच्यातर्फे आज हा उपक्रम राबविला गेला आहे, तो अतिशय कौतुकास्पद आहे. हा विषय गृह आणि टेक्सटाइल या विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना तसेच टेक्सटाइल मंत्र्यांनाही याविषयी पत्र लिहिणार असून याविषयीची माहिती त्यांना देणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आणखी वाचा :

Pune Sachin Kharat : सगळ्यांचा डीएनए एकच मग स्वत:ला आदिवासी, दलित घोषित करा; सचिन खरात यांचं पुण्यात फडणवीसांना आव्हान

Pune ST : लालपरी पुन्हा सुसाट..! प्रवाशांना सेवा देताना आनंद होत असल्याचे म्हणत पुण्याच्या स्वारगेट डेपोतले कर्मचारी परतले कामावर!

Pune crime : पैसे देऊन मिळतंय दिव्यांग प्रमाणपत्र! पुण्यातल्या ससून रुग्णालयात होतोय काळाबाजार