AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरात बोलताना जयंत पाटलांची रवी राणांवर टीका; पैसा आणि मतांचा उल्लेख करत म्हणाले…

Jayant Patil on Ravi Rana : राष्ट्रवादी शरद पवार गटाची 'शिवस्वराज्य यात्रा' सध्या सुरु आहे. या यात्रेत जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी रवी राणा यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. जयंत पाटील सोलापुरात बोलताना नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

सोलापुरात बोलताना जयंत पाटलांची रवी राणांवर टीका; पैसा आणि मतांचा उल्लेख करत म्हणाले...
जयंत पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 12, 2024 | 6:11 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सध्या सुरु आहे. आज ही यात्रा सोलापुरात आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरकरांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सत्तेतील नेत्यांनी काढून ठेवले आहेत. वडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले, मला मत नाही दिले तर तुमच्या खात्यात दिलेले पैसे काढून घेईन… भाजपाच्या समर्थक आमदार एवढी माग्रुरी दाखवत आहे. आपला पराभव होणार हे माहिती आहे म्हणून यांनी योजना काढल्या आहेत आणि जाहिरातीसाठी 280 कोटी खर्च केला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

यंदा जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे- जयंत पाटील

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असं देशात कोणाला वाटत नव्हतं. मात्र महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्ह्याने कामगिरी केली. 2019 च्या निवडणुकीआधी शरद पवार साहेब सोलापूरला आले तेव्हा प्रचंड गर्दी केली. मागीलवेळी शिवस्वराज्य यात्रा काढली. त्यावेळी 54 जागी विजयी झालो. यावेळी कितीतरी जास्त जागी आम्ही निवडून येऊ… त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील दोन मराठी नेत्यांनी निर्माण केलेले दोन्ही पक्ष भाजपने फोडले. पवार साहेबांना सोडून गेलेल्या नेत्यांसोबत जनता गेली का तर नाही. महाराष्ट्रात मोठ मोठे इव्हेंट पाहायला मिळतात. प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सत्तेतील नेत्यांनाही परभवाची चाहूल लागली आहे. आता आपण काम करायचं आणि आपलं सरकार आणायचं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांना सूचना

राज्यात आणि मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटचा आमदार निवडून येणार आहे. साताऱ्यातील महेश शिंदे नमक आमदार म्हणतात, की आत्ता तुम्ही निधी घ्या. निवडणुकीनंतर स्क्रूटीनी करू…. आता वेळ आली आहे महाराष्ट्रातील सरकार बदलण्याची… आता आपण कामाला लागले पाहिजे. मोहोळमध्ये एकत्र येऊन एकच उमेदवार ठरवा. 100 टक्के विजयी होणारा उमेदवार निवडा आणि उमेदवार कसा विजयी होईल ते पहा, अशा सूचना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.