AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीसाठी युवकाने वडिलाला संपविले, आधी डोळ्यात तिखट टाकले नंतर…

प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले.

प्रेयसीसाठी युवकाने वडिलाला संपविले, आधी डोळ्यात तिखट टाकले नंतर...
CRIME NEWS
| Edited By: | Updated on: Jan 01, 2023 | 4:45 PM
Share

सोलापूर : पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलाने आपल्या जन्मदात्या पिताला पेटवून मारून टाकले असल्याची घटना घडली आहे. हे हत्या प्रकरण एका प्रेम प्रकरणातून (Love Affair) घडले. यामध्ये मयत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यानी दिली. तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेमसंबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध अमान्य होते.

यातूनच प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले. यातूनच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यास घेऊन जात डोळ्यात लाल तिखट टाकले. डोक्यावर दगड मारून पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्यात आले.

यामध्येच अफजल बागवान यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रेमासाठी चक्क मुलाने आपल्या बापानेच संपवले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. अशी माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली.

प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतात. पण, प्रेयसीसाठी बापाला संपविणारे विरळेच. प्रेमात काही लोकं आंधळे होतात, असं म्हणतात. त्यातलाच हा प्रकार दिसून येतो. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.