AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावायाचा आनंदात भन्नाट डान्स, थेट बेभान होऊन..

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवतीचे लग्न नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानीसोबत पार पडतंय. यादरम्यानच सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावयाचा एक धमाकेदार डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावायाचा आनंदात भन्नाट डान्स, थेट बेभान होऊन..
Sarang Lakhani
| Updated on: Jun 13, 2026 | 1:10 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवतीचे लग्न नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानीसोबत पार पडतंय. या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईमध्ये लग्न तर काही अन्य शहरांमध्ये रिशेप्शनचे आयोजन करण्यात आले. सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई सारंग लखानी लग्नापूर्वीच चर्चेत आला. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या असून त्यांचे होणारे व्याही हे भाजपाचे चंद्रपूर-गडचिरोलीचे विधान परिषदेचे उमेदवार होते. त्यांची बिनविरोध निवड झाली. सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई कोण आणि नक्की काय करतात हा प्रश्न अनेकांना पडला. यादरम्यानच आता सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावयाचा एक डान्सचा जबरदस्त असा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

वडील अरूण लखानी विधान परिषदेवर बिनविरोध गेल्यानंतरचा सारंग लखानी यांनी खास डान्स केला. आता त्यांचा हाच डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे यांचे जावई खास पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांच्या जावयाची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. वडिलांच्या विजयानंतर धमाकेदार डान्स सारंगने केला.

ढोल आणि ताश्यांच्या आतमध्ये उभे राहून सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई डान्स करताना व्हिडीओत दिसत आहेत. आजुबाजूला नक्की कोण आहे का आहे. याचा काहीही फरक त्यांच्यावर दिसत नाही. मस्त बेभान होऊन डान्स करत आहे. सारंग लखानीला पाहून अजूनही काही लोक डान्स करण्याकरिता पुढे आल्याचे बघायला मिळत आहे.

सुप्रिया सुळे यांच्या जावयाचा हा डान्सचा व्हिडीओ लोकांना आवडत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे आणि लखानी कुटुंबिय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. लखानी कुटुंबिय भाजपाच्या अत्यंत जवळचे आहे. ते भाजपात सक्रिय आहेत.

Follow Us