AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता देश वाचवायची वेळ… सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, सरकारवर जोरदार टीका, म्हटले..

नुकताच सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या उपोषणावर बोलताना म्हटले की, रोहितने 24 तासापासून अन्न खाल्ले नाहीये. सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. यासोबतच त्यांनी बेरोजगारी आणि महागाई याबाबतही भाष्य केले.

आता देश वाचवायची वेळ... सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, सरकारवर जोरदार टीका, म्हटले..
Supriya Sule
| Updated on: Jun 13, 2026 | 10:50 AM
Share

राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्याच्या मुद्द्यावर नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, विलीनीकरणाबाबतत आम्हाला कुणीच संपर्क केलेला नाही. राजकीय पक्षातले लोक कामांसाठी एकमेकांना भेटत असतात. ममता बनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात जी भेट झाली, त्यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत मला माहिती नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहिती नाही. शरद पवार यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही. ना शरद पवारांनी कोणाला प्रस्ताव दिलाय. एक खरी गोष्ट सांगते, सध्या देशाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे की, आता राजकारण करण्याची वेळ नाहीये. आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भष्टाचार.. आता एकमेकांना तु तु मैं मैं करत बसायचं की, नीट परीक्षेमधील मुलांचे भविष्य बघायचे.

सत्ताधारी आणि विरोधकांनी तु तु मैं मैं करायची की, आज, महागाई बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेला प्रत्येक शेतकरी असेल किंवा नागरिक असेल त्याला आधार द्यायचा. आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणलंय. घर फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणारही नाहीत.

पहिले शिवसेनेवर हल्ला झाला मग राष्ट्रवादीवर झाला आता तो हल्ला तुमुलवर होतो आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी रोहित पवार यांना सुरूवातीपासून विनंती करत होते की, तू असे उपोषण करू नको. आपली मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशिल हे सरकार आहे. त्यांच्याशी लढायला आपण आपली ताकद ही ठेवलीच पाहिजे.

त्याची अस्था, प्रेम शेतकऱ्यांवरच म्हणून त्याने ठरवले होते की, तो हे करणार काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता. पण आज सकाळी मी आढावा घेतला 24 तास झाले त्याने काही अन्न घेतले नाही आणि प्रचंड उन्हाळा आहे पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याकरिता रोहित मोठा लढा उभा करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा