AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्या, गोळ्या घाला…; मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर येणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

या आगारातील सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही असा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यावेळी सरकारने आम्हाला सात वेळा अल्टिमेटम दिला आहे तरीही आम्ही कामावर रुजू होणार नाही

आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्या, गोळ्या घाला...; मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर येणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार
आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कामावर हजर होणार नाही असा निर्धार इचलकरंजी आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 5:04 PM
Share

इचलकरंजीः सरकारने आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्यावी, गोळ्या घालव्यात पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार कोल्हापूर (Kolahpur) जिल्ह्यातील इचलकरंजी आगारातील (Ichalkaranji Depot) कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या आगारातील सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही असा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) घेतला आहे. यावेळी सरकारने आम्हाला सात वेळा अल्टिमेटम दिला आहे तरीही आम्ही कामावर रुजू होणार नाही, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या तीन तिघाडी सरकारला येणाऱ्या भविष्य काळात आम्ही यांची जागा दाखवून देऊ. सरकारने आम्हाला चौकात घेऊन फाशीची शिक्षा द्यावी, गोळ्या घालाव्यात पण आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून कामावर हजर होण्याच्या दिलेल्या सूचना कर्मचाऱ्यांकडून पाळल्या जाणार नसल्याचेच चित्र स्पष्ट होत आहे.

आमचा थोडाफार तरी विचार करा

महाविकास विकास आघाडीने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कामावर हजर होणार नाही असा ठाम निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या होत असलेल्या आंदोलनानंतरही एसटी महामंडळात अकरा हजार कर्मचारी भरती करून घेत आहेत, त्यामुले त्यांनी आमचा थोडाफार तरी विचार करावा, आजची जी आमची अवस्था झाली आहे, त्याला हे सरकार जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

एकही मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही

राज्य सरकाने एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्यानंतरही कर्मचारी हजर होऊ झाले नाहीत. याबद्दल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आजची जी आमची अवस्था आहे, ती या सरकारमुळे झाली आहे. सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, उद्धव ठाकरे, अजित पवार कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम देत आहेत तर अनिल परब हे कर्मचाऱ्यांना कामावर रुजू असल्याचे सागंत आहेत पण एकही मंत्रही आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, त्यामुळे त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असल्याचे मत एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

Marathi Bhasha Bhavan : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुढी पाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन, कसे असेल भवन?

पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची बदली? कृष्णप्रकाश यांच्याजागी विश्वास नांगरे पाटील येणार?

Sharad Pawar : शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्स’वर मत व्यक्त करताच ट्विटरवर ट्रेंड? भाजप नेत्यांकडून ’93’ चा व्हिडीओ ट्विट, देशभर ट्रेंड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.